मराठवाड्याचे सुपुत्र आयपीएस सुधीर केकाण यांना तेलंगणा केडर

| Updated on: Jul 05, 2019 | 4:46 PM

मुंबई : आयएएस किंवा आयपीएस होणं हे जसं प्रत्येक विद्यार्थ्याचं स्वप्न असतं, तसंच निवड झाल्यानंतर आवडीचं केडर मिळणं हा देखील तेवढाच महत्त्वाचा भाग असतो. अनेकांना आपण निवडल्याप्रमाणे केडर मिळतं, तर काहींची निराशा होते. मराठवाड्याचे सुपुत्र सुधीर केकाण यांना तेलंगणा केडर मिळालं आहे. 19 डिसेंबर रोजीच आयपीएस केडरचं वाटप करण्यात आलंय. सुधीर केकाण सध्या बंगळुरुत आहेत. […]

मराठवाड्याचे सुपुत्र आयपीएस सुधीर केकाण यांना तेलंगणा केडर
Follow us on

मुंबई : आयएएस किंवा आयपीएस होणं हे जसं प्रत्येक विद्यार्थ्याचं स्वप्न असतं, तसंच निवड झाल्यानंतर आवडीचं केडर मिळणं हा देखील तेवढाच महत्त्वाचा भाग असतो. अनेकांना आपण निवडल्याप्रमाणे केडर मिळतं, तर काहींची निराशा होते. मराठवाड्याचे सुपुत्र सुधीर केकाण यांना तेलंगणा केडर मिळालं आहे. 19 डिसेंबर रोजीच आयपीएस केडरचं वाटप करण्यात आलंय.

सुधीर केकाण सध्या बंगळुरुत आहेत. महाराष्ट्र केडर मिळालं नसलं तरी मराठवाड्याला लागूनच असलेल्या तेलंगणा राज्यात सेवा करायला मिळणार असल्यामुळे त्यांनी आनंद व्यक्त केलाय. दरम्यान, सुधीर केकाण पुढील एक वर्षभर सेवेत रुजू होणार नाहीत. आयएएस होणं हे त्यांचं स्वप्न आहे. पुढची पोस्ट मिळण्यासाठी ते पुन्हा एकदा यूपीएससी परीक्षेचा खडतर मार्ग पार करणार आहेत.

निवड झाल्यानंतर आवडीची पोस्ट न मिळाल्यास उमेदवाराला आवडत्या पोस्टसाठी पुन्हा परीक्षा देण्याची संधी असते. सुधीर केकाण यांनीही स्वतःला एक वर्ष वेळ देत या संधीचा फायदा घेण्याचा निर्णय घेतलाय. आयएएससाठी पुन्हा एकदा ते परीक्षा देणार आहेत.

2017 सालच्या बॅचचे आयपीएस अधिकारी सुधीर केकाण यांचा देशात 606 वा क्रमांक होता. त्यांना मुख्य परीक्षेत 845 तर मुलाखतीमध्ये 151 असे मिळून एकूण 996 गुण मिळाले होते. सुधीर केकाण यांच्यासोबतच महाराष्ट्रातील इतर परीक्षार्थींनीही घवघवीत यश मिळवत स्वप्न पूर्ण केलं होतं.

2017 च्या यूपीएससी नागरी सेवा परीक्षेत तेलंगणाचा दुराशेट्टी अनुदीप (1126), हरियाणाची अनु कुमारी (1124) आणि सचिन गुप्ता (1122) यांनी अनुक्रमे पहिला, दुसरा आणि तिसरा क्रमांक मिळवला होता. याच परीक्षेत उस्मानाबादच्या गिरीश बडोले (1083) यांनी महाराष्ट्रात पहिला, तर देशात विसावा क्रमांक मिळवला होता.