Bollywood Drugs : जया बच्चन यांच्या राज्यसभेतील वक्तव्यानंतर घराबाहेरील सुरक्षेत वाढ

| Updated on: Sep 16, 2020 | 4:15 PM

समाजवादी पार्टीच्या खासदार आणि ज्येष्ठ अभिनेत्री जया बच्चन यांच्या घराबाहेरील सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे (Jaya Bachhan on Bollywood Drugs).

Bollywood Drugs : जया बच्चन यांच्या राज्यसभेतील वक्तव्यानंतर घराबाहेरील सुरक्षेत वाढ
Follow us on

मुंबई : समाजवादी पार्टीच्या खासदार आणि ज्येष्ठ अभिनेत्री जया बच्चन यांच्या घराबाहेरील सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे (Jaya Bachhan on Bollywood Drugs). जया बच्चन यांनी राज्यसभेत बॉलिवूडमधील ड्रग्सच्या मुद्द्यावर भाष्य केले होते. “बॉलिवूडला ड्रग्सच्या मुद्द्यावरुन बदनाम करण्याचा प्रयत्न केला जात आहे”, असं जया बच्चन म्हणाल्या होत्या. जया बच्चन यांच्या या वक्तव्यानंतर बॉलिवूड ते राजकीय क्षेत्रातून वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत आहेत (Jaya Bachhan on Bollywood Drugs).

“ज्या लोकांनी बॉलिवूड इंडस्ट्रीतून नाव कमवलं आहे. ते आता याला गटार बोलत आहेत. मी याला अजिबात सहमत नाही. मी सरकारला अपील करते की, आम्हाला संरक्षण आणि सरकारचा पाठिंबा हवा”, असं जया बच्चन यांनी सांगितले.

“लोकं ज्या थाळीत खातात, त्यामध्येच छेद करतात”, असंही जया बच्चन यांनी सांगितले होते.

जया बच्चन यांच्या या वक्तव्यानंतर बॉलिवूड ते राजकीय क्षेत्रातून वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत आहे. काहीजण याचे समर्थन करत आहेत. तर काहीजण जया बच्चन यांच्या वक्तव्याच्या विरोध करत आहेत.

जया बच्चन यांच्या वक्तव्यावरुन वातावरण तापल्यामुळे त्यांच्या घराबाहेरील सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. त्यासोबत मुंबई पोलिसांचे एक पथकही तेथे दाखल करण्यात आले आहे.

रवी किशन काय म्हणाले होते ?

रवी किशन यांनी लोकसभेत सोमवारी ड्रग्ज संदर्भात भाष्य केलं होतं. बॉलिवूडमध्ये ड्रग्जचं वाढतं प्रमाण याबाबत रवी किशन यांनी चिंता व्यक्त केली. सरकारने ड्रग्जचं सेवन करणाऱ्या आणि त्याची तस्करी करणाऱ्यांवर बंदी घालावी, अशी मागणी करताना रवी किशन यांनी एनसीबीचं कौतुकही केलं. “भारतीय सिने जगतात ड्रग्ज घेणाऱ्यांचं प्रमाण जास्त आहे. या प्रकरणी काही जणांना अटकही केली आहे. एनसीबीही चांगल्या प्रकारे आपलं कर्तव्य पार पाडत आहे” या शब्दात रवी किशन यांनी एनसीबीचं कौतुक केलं होतं.

जया बच्चन यांच्या वक्तव्यानंतर कंगनाचे जहरी ट्वीट

“जयाजी, जर माझ्या जागी तुमची मुलगी श्वेतासोबत किशोरवयात मारहाण, ड्रग्ज देणे आणि विनयभंग झाला असता तर तुम्हीही असेच म्हणाला असतात का? अभिषेकने सतत गुंडगिरी आणि छळवणूक झाल्याबद्दल तक्रार केली असती, आणि एक दिवस तो लटकलेल्या अवस्थेत आढळला असता, तर आपण असेच बोलला असता काय?” असा सवाल अभिनेत्री कंगना रनौत हिने जुही सिंहचा व्हिडीओ शेअर करत विचारला.

संबंधित बातम्या :

जया बच्चन यांचा भाजप खासदार रवी किशनवर अप्रत्यक्ष निशाणा, अभिषेकचे नाव घेत कंगनाचे जहरी ट्वीट

Jaya Bachchan | जया बच्चन यांचा बॉलिवूड बदनामीविरुद्ध आवाज