Kapil Sharma | कॉमेडी किंग कपिल शर्मा दुसऱ्यांदा बाबा बनणार, नव्या वर्षात नवी गुड न्यूज

| Updated on: Nov 20, 2020 | 11:40 AM

लवकरच कपिलच्या घरी आणखी एका बाळाचे आगमन होणार असून, तो दुसऱ्यांदा ‘बाबा’ होणार आहे.

Kapil Sharma | कॉमेडी किंग कपिल शर्मा दुसऱ्यांदा बाबा बनणार, नव्या वर्षात नवी गुड न्यूज
Follow us on

मुंबई : आपल्या विनोदांनी सगळ्या रसिकांना पोट धरून हसायला लावणाऱ्या कपिल शर्माने (Kapil Sharma) चाहत्यांना पुन्हा एकदा गुडन्यूज दिली आहे. लवकरच कपिलच्या घरी आणखी एका बाळाचे आगमन होणार असून, तो दुसऱ्यांदा ‘बाबा’ होणार आहे (Second Child). कपिल शर्माची पत्नी गिन्नी गर्भवती असून, नव्या वर्षात त्यांच्या घरी चिमुकल्या पावलांनी नवा पाहुणा येणार आहे. नुकत्याच एका व्हिडीओमध्ये गिन्नी तिचा बेबी बंप फ्लाँट करताना दिसली. यानंतर आता कपिल शर्मा आणि गिन्नी दोघांवरही चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे (Kapil Sharma And Wife Ginni Expecting their second Child).

गिन्नीची काळजी घेण्यासाठी कपिल शर्माचे कुटुंब आणि गिन्नीची आईदेखील मुंबईला आले आहे. कपिल शर्माला या आधी एक मुलगी असून, तो नेहमीच तिचे क्युट फोटो शेअर करत असतो.

सुवर्ण मंदिरात नव्या पाहुण्यासाठी प्रार्थना

काही दिवसांपूर्वी कपिल शर्मा अमृतसरच्या सुवर्ण मंदिरात प्रार्थना करताना दिसला होता. त्यानंतर आता त्याच्याकडे नव्या पाहुण्याच्या आगमनाची चाहूल लागली आहे. यावरून तो नक्कीच या बाळासाठी प्रार्थना करायला अमृतसरला पोहोचला होता, असा अंदाज त्याच्या चाहत्यांनी बांधला आहे. कपिल शर्माच्या या आनंदात त्याचे चाहतेदेखील सहभागी झाले आहेत. कपिलसह पत्नी गिन्नी चत्रथवर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे (Kapil Sharma And Wife Ginni Expecting their second Child).

भारती सिंहच्या व्हिडीओमध्ये गिन्नीची झलक

अभिनेत्री भारती सिंहने ‘करवा चौथ’च्या निमित्ताने सोशल मीडियावर खास व्हिडीओ शेअर केला होता. या लाईव्ह व्हिडीओमध्ये कपिल आणि त्याची पत्नी गिन्नीदेखील दिसले होते. याच व्हिडीओमध्ये गिन्नीचा ‘बेबी बंप’ दिसल्याने कपिलची ही गुडन्यूज उघड झाली आहे. दिवाळीच्या निमित्ताने कपिल शर्माने त्याच्या कुटुंबासह फोटो शेअर केले होते. या फोटोंमध्ये गिन्नी आपला ‘बेबी बंप’ लपवताना दिसली होती.

दुसऱ्यांदा ‘बाबा’ होणार

नव्या बाळाच्या आगमनाने कपिल शर्मा दुसऱ्यांदा ‘बाबा’ होणार आहे. कपिलची लेक ‘अनायरा’ डिसेंबर महिन्यात एक वर्षाची होणार आहे. कपिल शर्माने त्यांच्या दुसऱ्या बाळाबद्दल अद्याप कुठलीही अधिकृत घोषणा केलेली नाही. कपिल आणि गिन्नीने नेहमीच त्यांचे वैयक्तिक आयुष्य झगमगाटी विश्वापासून दूर ठेवले होते. नुकताच कपिलने आपला वाढदिवस कुटुंबासोबत साजरा केला होता. या निमित्ताने त्याने एका संस्थेला आर्थिक मदत केली.

(Kapil Sharma And Wife Ginni Expecting their second Child)