जम्मू काश्मीरमध्ये भारतीय जवानांची थेट कारवाई, पाच दहशतवाद्यांचा खात्मा

| Updated on: Jul 05, 2019 | 4:29 PM

श्रीनगर : दक्षिण काश्मीरमधील कुलगाम जिल्ह्यात भारतीय जवानांनी पाच दहशतवाद्यांचा खात्मा केलाय. तब्बल आठ तास चाललेल्या या ऑपरेशननंतर भारतीय जवानांनी सर्व दहशतवाद्यांचा खात्मा केला. कंठस्नान घालण्यात आलेल्या दहशतवाद्यांकडून भारतीय जवानांनी मोठ्या प्रमाणात शस्त्र आणि दारुगोळा जप्त केला आहे. केलम या भागात दहशतवादी लपल्याची माहिती शनिवारी रात्री उशीरा मिळाली होती. या माहितीनंतर 9 राष्ट्रीय रायफल्स, जम्मू […]

जम्मू काश्मीरमध्ये भारतीय जवानांची थेट कारवाई, पाच दहशतवाद्यांचा खात्मा
Follow us on

श्रीनगर : दक्षिण काश्मीरमधील कुलगाम जिल्ह्यात भारतीय जवानांनी पाच दहशतवाद्यांचा खात्मा केलाय. तब्बल आठ तास चाललेल्या या ऑपरेशननंतर भारतीय जवानांनी सर्व दहशतवाद्यांचा खात्मा केला. कंठस्नान घालण्यात आलेल्या दहशतवाद्यांकडून भारतीय जवानांनी मोठ्या प्रमाणात शस्त्र आणि दारुगोळा जप्त केला आहे.

केलम या भागात दहशतवादी लपल्याची माहिती शनिवारी रात्री उशीरा मिळाली होती. या माहितीनंतर 9 राष्ट्रीय रायफल्स, जम्मू काश्मीर पोलिसांची ओएसजी आणि सीआरपीएफ जवानांनी गावाला घेराव घातला आणि सर्च ऑपरेशन सुरु केलं. या ठिकाणी दोन घरांमध्ये लपलेल्या दहशतवाद्यांनी जवानांवर गोळीबार सुरु केला. प्रत्युत्तरादाखल भारतीय जवानांनीही काऊंटर ऑपरेशन सुरु केलं.

रविवारी सकाळी पाच वाजल्यापासून भारतीय जवानांनी ऑपरेशन सुरु केलं. दहशतवादी ज्या घरात लपले होते, ते घरंच उडवून दिले, ज्यात दहशतवाद्यांचा जागीच खात्मा झाला. दहशतवाद्यांच्या मृतदेहांसोबतच मोठ्या प्रमाणात शस्त्र आणि दारुगोळाही मिळून आला. मारण्यात आलेल्या दहशतवाद्यांमध्ये एक मोस्ट वाँटेड कमांडर असल्याचंही बोललं जातंय.

दरम्यान, स्थानिकांकडून भारतीय सैन्याच्या या ऑपरेशनमध्ये अनेक अडथळे आणण्याचे प्रयत्न झाले. सर्च ऑपरेशन सुरु असतानाच दगडफेकही सुरु झाली. यानंतर सीआरपीएफ जवानांनी जमावाला पांगवण्यासाठी अश्रूधुराचे गोळे फोडले. दगडफेकीमुळे चार जवानही गंभीर जखमी झाल्याची माहिती आहे. या जवानांवर उपचार सुरु आहेत.