वर्षाचे शेवटचे सूर्यग्रहण 26 डिसेंबरला, देशातील या भागात दिसणार ग्रहण

| Updated on: Dec 18, 2019 | 9:09 AM

या वर्षाचे शेवटेचे सूर्यग्रहण 26 डिसेंबर 2019 रोजी लागणार आहे. हे कंकणाकृती सूर्यग्रहण (Solar Eclipse india in December) असेल, तर देशातील काही भागात खंडग्रास अवस्थेत सूर्यग्रहण दिसेल.

वर्षाचे शेवटचे सूर्यग्रहण 26 डिसेंबरला, देशातील या भागात दिसणार ग्रहण
Follow us on

मुंबई : या वर्षाचे शेवटेचे सूर्यग्रहण 26 डिसेंबर 2019 रोजी लागणार आहे. हे कंकणाकृती सूर्यग्रहण (Solar Eclipse india in December) असेल, तर देशातील काही भागात खंडग्रास अवस्थेत सूर्यग्रहण दिसेल. यापूर्वी याचवर्षी 6 जानेवारी आणि 2 जुलै 2019 रोजी खंडग्रास सूर्यग्रहण (Solar Eclipse india in December) लागले होते.

“भारतात सूर्योदयानंतर कंकणाकृती सूर्यग्रहण देशातील दक्षिण भाग कर्नाटक, केरळ आणि तामिळनाडूमध्ये दिसेल. तर देशातील इतर भागात हे ग्रहण खंडग्रास सूर्यग्रहणच्या रुपात दिसेल”, असं खगोल शास्त्रज्ञांनी सांगितले.

भारतीय वेळेनुसार खंडग्रास सूर्यग्रहण सकाळी 8 वाजता दिसेल. तर कंकणाकृती सूर्यग्रहण सकाळी 9.06 वाजता दिसेल. सूर्यग्रहणाची कंकणाकृती अवस्था दुपारी 12 वाजून 29 मिनिटांनी संपेल. तर ग्रहणाची खंडग्रास अवस्था दुपारी 1 वाजून 36 मिनिटांनी संपेल.

या सूर्यग्रहणामध्ये सुर्याचा 93 टक्के भाग हा चंद्राने झाकला जाईल. सूर्य आणि पृथ्वीच्यामध्ये चंद्र आल्यामुळे सुर्याचा प्रकाश पृथ्वीवर पोहोचणार नाही याला सूर्यग्रहण म्हणतात.

दरम्यान, यानंतर सूर्यग्रहण भारतात 21 जून 2020 दिसेल. ते एक कंकणाकृती सूर्यग्रहण असेल. कंकणाकृती अवस्थेचे सूर्यग्रहण भारतातून जाईल. तर देशाच्या शेष भागात हे सूर्यग्रहण खंडग्रास रुपात दिसेल.

कंकणाकृती आणि खंडग्रास सूर्यग्रहण म्हणजे काय ?

कंकणाकृती सूर्यग्रहणात चंद्रबिंबाचा आकार लहान असल्याकारणाने सूर्य संपूर्ण झाकला जात नाही. चंद्र पृथ्वीच्या जास्तीत जास्त लांब (म्हणजे सूर्यबिंबामध्ये पूर्णपणे मावू शकेल एवढा) आला की होणार्‍या सूर्यग्रहणाला कंकणाकृती म्हणतात.

ज्या सूर्यग्रहणात चंद्र हा सुर्याला पूर्णपणे व्यापू शकत नाही त्या सूर्यग्रहणाला खंड-ग्रास म्हणतात. (कंकणाकृती हे देखील खंडग्रासच आहे. फक्त यात संपूर्ण रिंग दिसते म्हणून हा प्रकार वेगळा गृहीत धरला जातो.)