Live Update : पुण्यात बंगळुरु राष्ट्रीय महामार्गावर नवले पुलाजवळ विचित्र अपघात

| Updated on: Oct 06, 2020 | 1:27 PM

दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी फक्त एका क्लिकवर, टीव्ही 9 मराठीवर | Live updates Breaking News Important News of the day

Live Update : पुण्यात बंगळुरु राष्ट्रीय महामार्गावर नवले पुलाजवळ विचित्र अपघात
Follow us on

[svt-event title=”पुण्यात बंगळुरु राष्ट्रीय महामार्गावर नवले पुलाजवळ विचित्र अपघात” date=”06/10/2020,11:42AM” class=”svt-cd-green” ] पुण्यात बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर नवले पुलाजवळ विचित्र अपघात, पंधरा गाड्या एकमेकांना धडकल्या, 3 ते 4 जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती [/svt-event]

[svt-event title=”नाशिक ग्रामीण पोलीस अधीक्षक सचिन पाटील अॅक्शन मोडमध्ये” date=”06/10/2020,11:27AM” class=”svt-cd-green” ] नाशिक ग्रामीण पोलीस अधीक्षक सचिन पाटील अॅक्शन मोडमध्ये, गुन्हेगारांची माहिती देण्यासाठी हेल्पलाईन नंबर जारी, नागरिकांनी गुन्हेगारांची माहिती दिल्यास तात्काळ होणार कारवाई, जिल्ह्यातील टॉप 10 गुन्हेगारांची यादी तयार, आलेल्या तक्रारींची दखल न घेतल्यास अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर देखील होणार कारवाई, पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांची माहिती [/svt-event]

[svt-event title=”वर्ध्यात अंगणात झाडू मारणाऱ्या आजीबाईंच्या गळ्यातील 40 ग्रॅम सोन्याची चैन लंपास” date=”06/10/2020,11:16AM” class=”svt-cd-green” ] वर्ध्यात अंगणात झाडू मारणाऱ्या आजीबाईंच्या गळ्यातील 40 ग्रॅम सोन्याची चैन लंपास, दिवसा ढवळ्या चैन लंपास केल्याने परिसरात दहशत, गळ्यातील चैन लंपास करतानाचा थरार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद, सोमवारी सकाळी घडली घटना, वर्धेच्या यशवंत नगर परिसरातील घटना [/svt-event]

[svt-event title=”सोलापूर पोलीस आयुक्त अंकुश शिंदेंना अरुण बोंगिरवार पब्लिक सर्विसेस क्लास पुरस्कार जाहीर” date=”06/10/2020,11:12AM” class=”svt-cd-green” ] सोलापूर पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांना अरुण बोंगिरवार पब्लिक सर्विसेस क्लास पुरस्कार जाहीर, प्रशासकीय आणि पोलीस दलात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्यांना दरवर्षी दिला जातो बोंगिरवार पब्लिक सर्विस पुरस्कार, गडचिरोलीत केला होता अनेक नक्षलवाद्यांचा खात्मा, तर आदिवासींच्या मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी केले होते प्रयत्न, सोलापुरात पोलीस आयुक्त अंकुश शिंदे ठरले आहेत अवैध धंद्यांचे कर्दनकाळ [/svt-event]

[svt-event title=”कोल्हापूर-मुंबई विमानसेवा 27 ऑक्टोबर पासून सुरू होणार” date=”06/10/2020,11:05AM” class=”svt-cd-green” ] कोल्हापूर-मुंबई विमानसेवा 27 ऑक्टोबर पासून सुरू होणार, तब्बल सहा महिन्यानंतर विमान मुंबईसाठी टेक ऑफ होणार, आठवड्यातून तीन दिवस सुरू राहणार सेवा, सध्या कोल्हापूर-हैदराबाद आणि कोल्हापूर-बंगळुरु अशी सुरु आहे विमान सेवा [/svt-event]

[svt-event title=”कोल्हापूरच्या मराठा कार्यकर्त्यांना नवी मुंबई पोलिसांनी पकडलंघेतले ताब्यात” date=”06/10/2020,10:49AM” class=”svt-cd-green” ] कोल्हापूरच्या मराठा कार्यकर्त्यांना नवी मुंबई पोलिसांनी ताब्यात घेतले, मातोश्रीवरील आंदोलनापूर्वीच मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांना घेतले ताब्यात, पहाटे 4 वाजता ताब्यात घेऊन त्यांना पुण्यात सोडण्यात आल्याची माहिती, MPSC ची परीक्षा पुढे ढकलावी या मागणी साठी मुख्यमंत्रीच्या निवस्थानाबाहेर करणार होते आंदोलन [/svt-event]

[svt-event title=”चंद्रपुरातील राजुरा तालुक्यात पुन्हा वाघाचा हल्ला, हल्ल्यात एकाचा मृत्यू” date=”06/10/2020,10:39AM” class=”svt-cd-green” ] चंद्रपुरातील राजुरा तालुक्यात पुन्हा वाघाचा हल्ला, खांबाला जंगलात घडली घटना, गुरे चारण्यासाठी गेलेला मारोती पेंदोर घरी परतला नाही, अखेर शोधाशोध केल्यावर शरीराचे तुकडे आढळले, वाघाने 60 टक्के शरीर खाल्ले, या भागात वाघाच्या सततच्या हल्ल्यांनी नागरिक संतापले, RT1 वाघाला जेरबंद करण्यासाठी गेले 3 महिने सुरू आहे अभियान, आतापर्यंत 8 बळी गेल्याने वनविभागाच्या मोहिमेवर प्रश्नचिन्ह [/svt-event]

[svt-event title=”टीव्ही 9 मराठी लाईव्ह” date=”06/10/2020,10:37AM” class=”svt-cd-green” ] [/svt-event]