अनुदानित आणि विनाअनुदानित सिलेंडरच्या किंमतीत कपात

| Updated on: Jul 05, 2019 | 4:55 PM

नवी दिल्ली : वर्षाअखेर सर्वसामान्यांना खुशखबर मिळाली आहे. अनुदानित आणि विनाअनुदानित गॅस सिलेंडर स्वस्त झालं आहे. अनुदानित गॅस सिलेंडर 6.52 रुपये, तर विनाअनुदानित गॅस सिलेंडर 133 रुपयांनी स्वस्त झालंय. नवे दर मध्यरात्रीपासून लागू होणार आहेत. विनाअनुदानित सिलेंडरचे दर एक हजार रुपयांच्या जवळ आले होते, पण या दर कपातीमुळे काही प्रमाणात दिलासा मिळणार आहे. मुंबईत अनुदानित […]

अनुदानित आणि विनाअनुदानित सिलेंडरच्या किंमतीत कपात
Follow us on

नवी दिल्ली : वर्षाअखेर सर्वसामान्यांना खुशखबर मिळाली आहे. अनुदानित आणि विनाअनुदानित गॅस सिलेंडर स्वस्त झालं आहे. अनुदानित गॅस सिलेंडर 6.52 रुपये, तर विनाअनुदानित गॅस सिलेंडर 133 रुपयांनी स्वस्त झालंय. नवे दर मध्यरात्रीपासून लागू होणार आहेत. विनाअनुदानित सिलेंडरचे दर एक हजार रुपयांच्या जवळ आले होते, पण या दर कपातीमुळे काही प्रमाणात दिलासा मिळणार आहे.

मुंबईत अनुदानित सिलेंडर कमी अधिक प्रमाणात 500 रुपयांच्या आसपास असेल, तर विनाअनुदानित सिलेंडर कमी अधिक प्रमाणात 800 रुपयांच्या आसपास असेल. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे घसरलेले दर आणि डॉलरची तुलनेत रुपया मजबूत होत असल्यामुळे हे दर कमी झाले आहेत.

गेल्या काही महिन्यांपासून महागाईने सर्वसामान्यांचं कंबरडं मोडलं आहे. पेट्रोल आणि डिझेलने नव्वदी गाठली होती, तर डिझेलही 80 रुपये प्रति लिटरच्या वर गेलं होतं. पण आंतरराष्ट्रीय बाजारात सतत कच्च्या तेलाचे दर घसरल्यामुळे मुंबईत सध्या पेट्रोल 78.43 रुपये प्रति लिटर, तर डिझेल 70.89 रुपये प्रति लिटर आहे.

डॉलरच्या तुलनेत रुपयाही विक्रमी घसरला होता. पण गेल्या एक महिन्यापासून रुपयामध्ये सुधारणा झाली आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या दरांचा परिणाम केवळ वाहनधारकांवरच नाही, तर महागाईवरही याचा परिणाम झाला होता.