Chandrakant Patil: महाराजांच्या वंशजांचा मान नाही तर पक्षाच्या नावात ‘शिव’ वापरायचा नैतिक अधिकारही नाही- चंद्रकांत पाटील

| Updated on: May 27, 2022 | 3:04 PM

यापूर्वीही चंद्रकांत पाटील यांनी भाजपने संभाजीराजे यांना थेट राष्ट्रपती कोट्यातून राज्यसभेचे खासदार केले होते. आता शिवसेनेने संभाजीराजेंची अपेक्षा पूर्ण करून त्यांचा सन्मान करावा अशी अपेक्षा आहे असे कोल्हापुरात पत्रकारांशी बोलताना म्हटले होते. 

Chandrakant Patil: महाराजांच्या वंशजांचा मान नाही तर पक्षाच्या नावात शिव वापरायचा नैतिक अधिकारही नाही- चंद्रकांत पाटील
चंद्रकांत पाटील, प्रदेशाध्यक्ष, भाजप
Image Credit source: TV9
Follow us on

पुणे – राज्यसभा उमेदवारीबाबत उद्धव ठाकरेंनी शब्द मोडला. शिवसेनेत(Shivasena) प्रवेशाचा प्रस्ताव स्वीकारता येणार नाही, हे स्पष्ट केल्याचं छ. संभाजीराजे सांगताहेत.शब्द मोडल्याचा आरोप ठेवून करून युती तोडणारे उद्धवजी आता काय बोलाल? संभाजीराजेही खोटं बोलताहेत? त्यांचा फोनही न घेणं कुठल्या सभ्यतेत बसतं? शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर जाऊन खरं-खोटं करण्याचं संभाजीराजेंचं (sanbhajiraje) आव्हान उद्धव जींनी स्वीकारावं. मग कुणी खंजीर खुपसला, हे जनतेला समजेल तरी. महाराजांच्या वंशजांचा मान ठेवायचा नाही, तर पक्षाच्या नावात ‘शिव’ वापरायचा नैतिक अधिकारही नाही! शोधा एखादं तथाकथित सेक्युलर नाव अशी टीका आमदार चंद्रकांत पाटील (MLA Chandrakant Patil) यांनी शिवसेनेवर केली आहे.  यापूर्वीही चंद्रकांत पाटील यांनी भाजपने संभाजीराजे यांना थेट राष्ट्रपती कोट्यातून राज्यसभेचे खासदार केले होते. आता शिवसेनेने संभाजीराजेंची अपेक्षा पूर्ण करून त्यांचा सन्मान करावा अशी अपेक्षा आहे असे कोल्हापुरात पत्रकारांशी बोलताना म्हटले होते.

ते माझ्या तत्वातही नाही आणि रक्तातही

राज्यसभेच्या खासदारकीवरून संभाजी छत्रपती यांनी शिवसेनेमधील वाद चांगलाच पेटला आहे. ‘ जे मला बोलयाचं, ते बोलायची मला मुळीच इच्छा नाही, ते माझ्या तत्वातही नाही आणि रक्तातही. पण मी मुख्यमंत्र्यांना सांगू इच्छितोय, की कोणतंही शिवाजी महाराजांचं स्मारक असेल, तिथं आपण दोघंही जाऊ आणि दोघंही छत्रपती शिवाजी महाराजांना स्मर करण करु.. आणि संभाजी छत्रपती खोटं बोलत असेल तर तुम्ही सांगायचं मग…असे संभाजी छत्रपती यांनी म्हटलं आहे.

दिलेला शब्द त्यांनी मोडला

शिवसेनेच्या दोन खासदारांना मुख्ममंत्र्यांनी माझ्याकडे पाठवलं होतं. त्यांच्यासोबत आमची चर्चा झाली. त्यांना मला सांगितलं की, तुम्ही शिवसेनेत यावं.
पण मी त्यांना स्पष्टत सांगितलं होतं की मी शिवसेनेत प्रवेश करु शकत नाही. पुन्हा दोन दिवसांनी खुद्द मुख्यमंत्र्यांनीच फोन केला आणि मला चर्चेचं निमंत्रण दिलं. मी त्यांना भेटायला गेलो, मुख्यमंत्रीपदाचा मान ठेवला. तेव्हा दोन मुद्द्यांवर चर्चा झाली. आम्हाला छत्रपतींना बाजूला ठेवायचं नाही, आम्हाला ते सोबत हवेत, असं मुख्यमंत्री मला म्हणाले. मुख्यमंत्री मला शिवसेनेत यायला सांगितलं, पण मी म्हटलं की मी अपक्ष लढणार आहे, त्याच क्षणी मी मुख्यमंत्र्यांना नकार दिला! मग मी त्यांना एक प्रस्ताव दिला. शिवसेनेची आणखी एक सीट आहे, असं ते म्हणाले. शिवसेनेच्या पुढाकारातून महाविकास आघाडी पुरस्कृत उमेदवार मला घोषित करा असंही मी त्यांना म्हणालो. तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मला म्हणाले की, राजे ते शक्य नाही.. पण शिवसेना पुरस्कृत अपक्ष उमेदवार करायला आम्ही तयार आहोत, असं ते म्हणाले होते.

हे सुद्धा वाचा

कोल्हापुरात परतत असताना वेगळ्यात बातम्या समोर आल्या. मी वर्षावर शिवबंधन बांधणार, शिवसेनेत जाणार, वगैरे चर्चा सुरु झाल्या होत्या. कोल्हापुरात गेल्यानंतर कळलं की संजय पवार यांना शिवसेनेने उमेदवारी जाहीर केलीय. म्हणून मग मी शिवसेना खासदारांना विचारणा केली मंत्र्यांना विचारणा केली, त्यांच्याकडे काहीच उत्तर नव्हतं! मुख्यमंत्र्यांनी काही माझा फोन घेतला नाही.. मला इतकं वाईट वाटतंय…, मुख्यमंत्र्यांकडून मला ही अपेक्षा नव्हती की दिलेला शब्द त्यांनी मोडला! असा थेट आरोप छत्रपती संभाजी यांनी केला आहे.