टीव्ही 9 इम्पॅक्ट : दुचाकीधारकांच्या रेशन कार्ड रद्दचा निर्णय मागे

| Updated on: Jul 18, 2019 | 11:06 AM

रेशन कार्डबाबत राज्य सरकारच्या अजब निर्णयाचं वृत्त टीव्ही 9 मराठीने दाखवल्यानंतर, सरकारने एक पाऊल मागे घेतलं आहे. घरात दुचाकी असेल तर रेशन कार्ड रद्द करण्याचा निर्णय सरकारने मागे घेतला आहे.

टीव्ही 9 इम्पॅक्ट : दुचाकीधारकांच्या रेशन कार्ड रद्दचा निर्णय मागे
Follow us on

नागपूर : रेशन कार्डबाबत राज्य सरकारच्या अजब निर्णयाचं वृत्त टीव्ही 9 मराठीने दाखवल्यानंतर, सरकारने एक पाऊल मागे घेतलं आहे. घरात दुचाकी असेल तर रेशन कार्ड रद्द करण्याचा निर्णय सरकारने मागे घेतला आहे.  ‘टीव्ही 9 मराठी’च्या बातमीची दखल राज्य सरकारने घेतली.

दुचाकी किंवा चारचाकी असेल किंवा तुमचं शेतीचं उत्पन्न वाढलं, तर शिधापत्रिका रद्द होऊ शकते, असा निर्णय राज्य सरकारने घेतला होता. त्याबाबतचं वृत्त टीव्ही 9 मराठीने 9 जुलैला दाखवलं होतं. या वृत्तामुळे गाव-खेड्यातील नागरिकांनी संताप व्यक्त केला होता. हल्ली गावात प्रत्येक घरात एखादी दुचाकी असतेच. त्यामुळे सरकारच्या या निर्णयावर टीका होत होती. राज्य सरकारच्या या निर्णयाने राज्यातील साधारण 30 लाखांपेक्षा जास्त शिधापत्रिका रद्द होण्याची शक्यता होती.  नेमकं हेच वास्तव टीव्ही 9 मराठीने दाखवल्यानंतर, सरकारने हा निर्णय आता मागे घेतला आहे.

राज्य सरकारच्या अन्न पुरवठा विभागाच्या माध्यमातून शिधापत्रिका धारकांना स्वस्त धान्याचं वितरण केलं जातं. राज्यात आधार लिंक झालेले साधारण दीड कोटींपेक्षा जास्त रेशनकार्डधारक आहेत. पण आता ज्यांचं उत्पन्न वाढलं, त्यांचं रेशनकार्ड रद्द करुन नविन लाभार्थ्यांना जोडण्यात येणार आहे.

साधारण दीड कोटींपेक्षा जास्त रेशनकार्डधारक आहेत. यातील अनेकांच्या शिधापत्रिका लवकरच रद्द होणार आहेत. म्हणजे यांना स्वस्त धान्य दुकानातून मिळणारं धान्य बंद होऊ शकतं. कारण प्राधान्यक्रम रेशनकार्डच्या लाभार्थ्यांना शहरात 59 हजारांच्या उत्पन्नाची अट आहे, तर ग्रामीण भागात 44 हजारांची अट आहे. त्यामुळे दुचाकी किंवा कार असणाऱ्या लाभार्थी श्रीमंत समजून सरकार, त्यांचे रेशन कार्ड रद्द करण्याच्या तयारीत होतं. त्यापैकी दुचाकीचा नियम आता मागे घेण्यात आला आहे.

संबंधित बातम्या 

घरात दुचाकी असेल तरीही रेशन कार्ड रद्द होणार, सरकारचा नवा निर्णय   

नागपूर : दुचाकी, कारवाल्यांचं रेशन कार्ड रद्द होणार