ऐन उन्हाळ्यात शिवशाहीची स्लीपर बससेवा बंद

| Updated on: Jul 05, 2019 | 4:04 PM

रत्नागिरी: गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर राज्यभरात नव्या कामांना सुरुवात केली जात असाताना, तिकडे एसटी महामंडळाने अजब निर्णय घेतला आहे. राज्यातील 27  खासगी स्लीपर शिवशाही बससेवा बंद करण्यात येणार आहे. महत्त्वाचं म्हणजे अॅडव्हान्स बुकिंग संपल्यावर लगेचच ही स्लीपर शिवशाही बंद करण्याचे आदेश महामंडळाने दिले आहेत. महामंडळला होणाऱ्या तोट्यामुळे ही स्लीपर शिवशाही सेवा बंद करण्याचा निर्णय महामंडळाने घेतला आहे. […]

ऐन उन्हाळ्यात शिवशाहीची स्लीपर बससेवा बंद
Follow us on

रत्नागिरी: गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर राज्यभरात नव्या कामांना सुरुवात केली जात असाताना, तिकडे एसटी महामंडळाने अजब निर्णय घेतला आहे. राज्यातील 27  खासगी स्लीपर शिवशाही बससेवा बंद करण्यात येणार आहे. महत्त्वाचं म्हणजे अॅडव्हान्स बुकिंग संपल्यावर लगेचच ही स्लीपर शिवशाही बंद करण्याचे आदेश महामंडळाने दिले आहेत.

महामंडळला होणाऱ्या तोट्यामुळे ही स्लीपर शिवशाही सेवा बंद करण्याचा निर्णय महामंडळाने घेतला आहे. एप्रिल महिन्यातील ज्या शेवटच्या दिवसाचे आगाऊ आरक्षण (अॅडव्हान्स बुकिंग) झालेले असेल, त्याच्या दुसऱ्याच दिवसापासून बुकिंग बंद करण्यात यावे, अशी सूचना एसटी महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी केली आहे.

ऐन उन्हाळ्यात प्रवाशांना गारेगार प्रवास देणाऱ्या शिवशाहीची स्लीपर सेवा बंद झाल्याने काहीशी नाराजी वर्तवण्यात येत आहे.

एस.टी महामंडळातर्फे राज्यातील विविध 42 मार्गावर वातानुकूलित शिवशाही बससेवा सुरु करण्यात आली होती. उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये प्रवाशांना गारेगार प्रवास तोही स्लीपरने होत असल्याने प्रवाशांमध्ये सुरुवातीला उत्साह होता. मात्र यापैकी तब्बल 27 मार्गांवरील सेवा, तोट्यामुळे बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.