आरामात ‘हलके’ व्हा! महाराष्ट्रातील पहिले AC शौचालय सुरु

| Updated on: Jul 05, 2019 | 4:34 PM

सोलापूर: सोलापूर शहरात पहिल्यांदाच वातानुकूलित अर्थात एसी सार्वजनिक शौचालय बांधण्यात आलं आहे. शहरातील मोठी बाजार पेठ असलेल्या बाळीवेस चौकात हे एसी AC शौचालय बांधण्यात आलं आहे. याठिकाणी राज्यातील व्यापारी मंडळी आणि नागरिक बाजार पेठेमध्ये खरेदी करण्यासाठी येतात. त्यांच्या सोयीसाठी शौचालयाची उभारणी करण्यात आली आहे. यासाठी महानगरपालिकेने 12 लाख रुपये निधी खर्च केला आहे. महाराष्ट्रातील हे […]

आरामात हलके व्हा! महाराष्ट्रातील पहिले AC शौचालय सुरु
Follow us on

सोलापूर: सोलापूर शहरात पहिल्यांदाच वातानुकूलित अर्थात एसी सार्वजनिक शौचालय बांधण्यात आलं आहे. शहरातील मोठी बाजार पेठ असलेल्या बाळीवेस चौकात हे एसी AC शौचालय बांधण्यात आलं आहे.

याठिकाणी राज्यातील व्यापारी मंडळी आणि नागरिक बाजार पेठेमध्ये खरेदी करण्यासाठी येतात. त्यांच्या सोयीसाठी शौचालयाची उभारणी करण्यात आली आहे. यासाठी महानगरपालिकेने 12 लाख रुपये निधी खर्च केला आहे.

महाराष्ट्रातील हे पहिले AC सुलभ शौचालय आहे. या ठिकाणी पुरुषांसाठी 5 युनिट आणि महिलांसाठी 5 युनिट तयार करण्यात आले आहेत. त्यामुळे आता या एसी सुलभ शौचालयाची चर्चा सोलापूरसह राज्यभरात चांगलीच रंगली आहे. मात्र असं असलं तरी अडचणीत असलेल्या महापालिकेने हे पाऊल उचलणे म्हणजे बेजबाबदारपणाचे असल्याची टीका विरोधकांनी केली आहे.

दुसरीकडे साध्या सार्वजनिक शौचालयांची अवस्था आपण पाहिली आहे. त्यामुळे ही एसी शौचालयांची स्वच्छता महापालिका कशी ठेवते हे पाहावं लागले.