बंगळुरुत एअर शोदरम्यान आग, शेकडो गाड्या जागच्या जागी पेटल्या

| Updated on: Jul 05, 2019 | 4:25 PM

Fire at Aero India 2019 in Bengaluru बंगळुरु: बंगळुरुत सुरु असलेल्या एअर शोमागील विघ्न सुरुच आहे. एअर शोपूर्वी सरावादरम्यान दोन विमानांची टक्कर होऊन पायलटचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असताना, आज या शोदरम्यान भीषण आग लागली. कार पार्किंगमध्ये आग लागल्याने अनेक गाड्यांनी पेट घेतला. एअर शो पाहण्यासाठी अनेक नागरिक आले आहेत. शिवाय अनेक मान्यवरही या कार्यक्रमाला […]

बंगळुरुत एअर शोदरम्यान आग, शेकडो गाड्या जागच्या जागी पेटल्या
Follow us on

Fire at Aero India 2019 in Bengaluru बंगळुरु: बंगळुरुत सुरु असलेल्या एअर शोमागील विघ्न सुरुच आहे. एअर शोपूर्वी सरावादरम्यान दोन विमानांची टक्कर होऊन पायलटचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असताना, आज या शोदरम्यान भीषण आग लागली. कार पार्किंगमध्ये आग लागल्याने अनेक गाड्यांनी पेट घेतला.

एअर शो पाहण्यासाठी अनेक नागरिक आले आहेत. शिवाय अनेक मान्यवरही या कार्यक्रमाला उपस्थित आहेत. या सर्वांच्या गाड्या कार पार्किंगमध्ये उभ्या होत्या. मात्र त्याच पार्किंगमध्ये आग लागल्याने अनेक गाड्या जळाल्या. त्यामुळे आजचा एअर शो रद्द करण्यात आला.

ही आग इतकी भीषण होती की, फटाक्यांच्या माळेप्रमाणे एकामागोमाग एक गाड्या पेटत गेल्या. उभ्या गाड्या जागच्या जागी जळून खाक झाल्याचं चित्रं पाहायला मिळालं.

जवळपास 80 ते 100 गाड्या जळाल्याची प्राथमिक माहिती अग्निशमन दलाने दिली.

दोन विमानांची टक्कर

कर्नाटकातील बंगळुरुमध्ये हवाईदलाच्या दोन विमानांची हवेतच टक्कर होऊन भीषण अपघात झाला. हवाई शो दरम्यान दोन सूर्यकिरण (Surya Kiran) या विमानांची हवेत धडक झाली.  19 फेब्रुवारी रोजी ही घटना घडली होती. यामध्ये पायलटचा मृत्यू झाला होता. त्यानंतर आज कार पार्किंगला भीषण आग लागली. त्यामुळे आजचा एअर शो रद्द करण्यात आला.

संबंधित बातम्या

सूर्यकिरण क्रॅश, दोन विमानांची हवेत धडक  

सूर्यकिरण क्रॅश, बंगळुरुत हवाई कसरतीदरम्यान दोन विमानांची धडक