हत्तीने सोंडेत पकडून आपटलं, जयसिंगपूरच्या भर बाजारात थरार

| Updated on: Jul 05, 2019 | 4:19 PM

कोल्हापूर: जयसिंगपूर शहरातील आठवडी बाजारात थरारक घटना घडली. रस्त्यावरुन जात असताना हत्तीने सोंडेत धरून आपटल्याने एक जण गंभीर जखमी झाला आहे. त्यामुळे शहरांत एकच खळबळ उडाली. ही व्यक्ती रस्त्यावरून जात असताना हत्तीने सोंडेत धरून शेजारच्या दुकानाच्या दरवाजावर आपटले. बाजारादिवशी ही थरारक घटना घडल्यामुळे बाजाराला आलेल्या नागरिकांची एकच पळापळ झाली. राजेंद्र शिवराम सावंत वय 50, असं […]

हत्तीने सोंडेत पकडून आपटलं, जयसिंगपूरच्या भर बाजारात थरार
प्रातिनिधीक फोटो
Follow us on

कोल्हापूर: जयसिंगपूर शहरातील आठवडी बाजारात थरारक घटना घडली. रस्त्यावरुन जात असताना हत्तीने सोंडेत धरून आपटल्याने एक जण गंभीर जखमी झाला आहे. त्यामुळे शहरांत एकच खळबळ उडाली. ही व्यक्ती रस्त्यावरून जात असताना हत्तीने सोंडेत धरून शेजारच्या दुकानाच्या दरवाजावर आपटले. बाजारादिवशी ही थरारक घटना घडल्यामुळे बाजाराला आलेल्या नागरिकांची एकच पळापळ झाली. राजेंद्र शिवराम सावंत वय 50, असं जखमी व्यक्तीचं नाव आहे. ते शिरोळ तालुक्यातील नांदणीचे रहिवासी आहेत.

काय आहे संपूर्ण घटना?

शिरोळ  शहरातील नांदणी जयसिंगपूर रस्त्यावर मच्छी-मटण मार्केटजवळ फिरत्या  हत्तीने राजेंद्र शिवराम सावंत यांच्यावर हल्ला केला. सायंकाळी  सातच्या सुमारास ही घटना घडली. यावेळी परिसरात मोठी खळबळ उडाली होती. नागरिकांच्या मदतीने सावंत यांना तात्काळ 108 रुग्णवाहिकेतून सांगली सिव्हील रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र प्राथमिक उपचारानंतर नातेवाईकांनी त्यांना सिटीस्कॅनसाठी  इतरत्र हलवले होते. त्यानंतर पुन्हा सांगली सिव्हिल हॉस्पिटलमध्ये अतिदक्षता विभागामध्ये उपचार सुरू ठेवले आहेत.

त्यांच्या डोकीला आणि छातीला मार बसला आहे. डोके आणि डोळ्यांना सूज आली असून थोड्या प्रमाणात रक्तस्त्रावही झाला आहे. जखमीच्या शरीरात अल्कोहोलचे प्रमाण आढळून आले असल्याचेही वैद्यकीय सूत्रांनी सांगितले.

जयसिंगपूर आठवडी बाजारादिवशी हत्ती रविवारी फिरत असतो. याबाबत काहीही माहिती नाही अशी माहिती पोलिसांनी दिली. घटनेनंतर मोठा जमाव जमला होता. काहींच्या मते सावंत यांना हत्तीने सोंडेत धरून दुकानाच्या शटरवर आपटले. शिवाय हत्तीने सावंत यांच्या शरिरावर पायही ठेवल्याचं काही नागरीकांनी सांगितले. घटनेनंतर नांदणी रस्त्यावर पळापळ झाली. याबाबत रात्री उशीरापर्यंत जयसिंगपूर पोलिसात गुन्हा नोंद झालेला नव्हता.