मोदींच्या शेवटच्या ‘मन की बात’ची तारीख ठरली!

| Updated on: May 21, 2019 | 1:14 PM

नवी दिल्ली : नरेंद्र मोदी यांनी 2014 साली सत्तेत आल्यानंतर आणि पंतप्रधानपदी विराजमान झाल्यानंतर देशवासियांशी संवाद साधण्यासाठी ‘मन की बात’ हा कार्यक्रम सुरु केला. विशिष्ट दिवसांच्या अंतराने विशिष्ट विषयांवर पंतप्रधान देशवासियांशी संवाद साधत राहिले. ‘मन की बात’ कार्यक्रमाचे आतापर्यंत 50 हून अधिक भाग झाले आहेत. आता या कार्यक्रमाचा शेवटचा भाग प्रसिद्ध होणार आहे. शेवटच्या भागाची […]

मोदींच्या शेवटच्या मन की बातची तारीख ठरली!
Follow us on

नवी दिल्ली : नरेंद्र मोदी यांनी 2014 साली सत्तेत आल्यानंतर आणि पंतप्रधानपदी विराजमान झाल्यानंतर देशवासियांशी संवाद साधण्यासाठी ‘मन की बात’ हा कार्यक्रम सुरु केला. विशिष्ट दिवसांच्या अंतराने विशिष्ट विषयांवर पंतप्रधान देशवासियांशी संवाद साधत राहिले. ‘मन की बात’ कार्यक्रमाचे आतापर्यंत 50 हून अधिक भाग झाले आहेत. आता या कार्यक्रमाचा शेवटचा भाग प्रसिद्ध होणार आहे. शेवटच्या भागाची तारीखही ठरली आहे.

23 फेब्रुवारी रोजी प्रसिद्ध झालेल्या ‘मन की बात’ कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले होते की, मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात ‘मन की बात’मधून भेटू. निवडणुकीमुळे मार्च आणि एप्रिल या दोन महिन्यात ‘मन की बात’ कार्यरक्रमाचा एकही भाग प्रसिद्ध झाला नव्हता. आता 26 मे रोजी ‘मन की बात’चा शेवटचा भाग प्रसिद्ध होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

‘मन की बात’ कार्यक्रम नेहमी रविवारी सकाळी 11 वाजता प्रसारित केला जातो. त्याप्रमाणे मे महिन्यातील शेवटचा रविवार 26 तारखेला आहे. त्यामुळे येत्या 26 तारखेला ‘मन की बात’चा शेवटचा भाग प्रसिद्ध होण्याची शक्यता आहे.

खरंतर आगामी ‘मन की बात’ कार्यक्रमाचा विषय अद्याप ठरला नसला, तरी राजकीय विषय नसेल, असे म्हटले जात आहे. याचे कारण लोकसभा निवडणुकीचे निकालही 26 मेपर्यंत स्पष्ट झालेले असतील.

3 ऑक्टोबर 2014 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘मन की बात’ कार्यक्रमाचा पहिला भाग प्रसारित झाला होता. 27 जानेवारी 2015 च्या भागात अमेरिकेचे तत्कालीन अध्यक्ष बराक ओबामा हे सुद्धा सहभागी झाले होते. बराक ओबामा हे भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमात मुख्य पाहुणे होते. ओबामांनी यावेळी अमेरिकेतील विविध लोकोपयोगी धोरणांची भारतीयांना माहिती दिली होती.