पुणे परिसरात रुळावरुन लोखंडी रॉड ठेवून रेल्वेच्या घातपाताचा प्रयत्न

| Updated on: Jul 05, 2019 | 3:37 PM

पुणे: पुण्यात रुळावरुन रेल्वे घसरवण्याचे अनेक प्रयत्न होत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली. यामुळे रेल्वेने प्रवास करणाऱ्या असंख्य प्रवाशांची धाकधूक होत आहे. पुणे रेल्वे अंतर्गत येणाऱ्या भागात रुळावर आडवे लोखंडी रॉड टाकून रेल्वे घसरवण्याचा प्रयत्न झाला. मात्र रेल्वे कर्मचारी आणि अधिकाऱ्यांमुळे या दुर्घटना टळल्या. आतापर्यंत 8 ते 10 ठिकाणी अशा घटना समोर आल्या आहेत. एप्रिल […]

पुणे परिसरात रुळावरुन लोखंडी रॉड ठेवून रेल्वेच्या घातपाताचा प्रयत्न
Follow us on

पुणे: पुण्यात रुळावरुन रेल्वे घसरवण्याचे अनेक प्रयत्न होत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली. यामुळे रेल्वेने प्रवास करणाऱ्या असंख्य प्रवाशांची धाकधूक होत आहे. पुणे रेल्वे अंतर्गत येणाऱ्या भागात रुळावर आडवे लोखंडी रॉड टाकून रेल्वे घसरवण्याचा प्रयत्न झाला. मात्र रेल्वे कर्मचारी आणि अधिकाऱ्यांमुळे या दुर्घटना टळल्या. आतापर्यंत 8 ते 10 ठिकाणी अशा घटना समोर आल्या आहेत.

एप्रिल मे महिन्यात हातकणंगले परिसरात दोन वेगवेगळया ठिकाणी अज्ञातांनी लोखंडी तुकडे रेल्वे ट्रॅकवर ठेवले होते. रेल्वेचा अपघात करुन नुकसान करण्याचा त्यांचा प्रयत्न होता. यानंतर काही दिवसांपूर्वी तळेगावमध्ये कामशेत येथे हैद्राबाद- मुंबई एक्स्प्रेसला टार्गेट करण्यात आलं होतं.

गेल्या अनेक दिवसात रेल्वे प्रशासनाच्या अशा अनेक गोष्टी समोर आल्या आहेत. मात्र रेल्वेच्या अधिकाऱ्यांच्या सतर्कतेमुळे मोठ्या दुर्घटना टळल्या आहेत. अशा गुन्हेगारी व्यक्ती कोणाला आढळल्यास पोलिसांना कळवण्याचं आवाहन पोलिसांनी केलं आहे.