स्मशानात लग्न! माजी मंत्र्यांच्या संस्थेचं प्रबोधनात्मक पाऊल

| Updated on: Jul 05, 2019 | 4:52 PM

बेळगाव : अंत्यसंस्कार आणि रक्षाभरणी कार्यक्रम सोडल्यास सहसा स्मशानात कुणीही जात नाही. स्मशानभूमी म्हणजे दुखवट्याची जागा मानली जाते. मात्र हल्ली महाशिवरात्रीचे औचित्य साधून महाप्रसाद वितरण कार्यक्रमाचे आयोजन स्मशानभूमीत करण्याचा प्रघात सुरू आहे. मात्र आता तर स्मशानात लग्नही होऊ लागली आहेत. माजी मंत्री सतीश जारकीहोळी संचालित मानव बंधुत्व वेदिकेच्या वतीने अंधश्रद्धा दूर करण्यासाठी बेळगावातील सदाशिव नगर येथील […]

स्मशानात लग्न! माजी मंत्र्यांच्या संस्थेचं प्रबोधनात्मक पाऊल
Follow us on

बेळगाव : अंत्यसंस्कार आणि रक्षाभरणी कार्यक्रम सोडल्यास सहसा स्मशानात कुणीही जात नाही. स्मशानभूमी म्हणजे दुखवट्याची जागा मानली जाते. मात्र हल्ली महाशिवरात्रीचे औचित्य साधून महाप्रसाद वितरण कार्यक्रमाचे आयोजन स्मशानभूमीत करण्याचा प्रघात सुरू आहे. मात्र आता तर स्मशानात लग्नही होऊ लागली आहेत. माजी मंत्री सतीश जारकीहोळी संचालित मानव बंधुत्व वेदिकेच्या वतीने अंधश्रद्धा दूर करण्यासाठी बेळगावातील सदाशिव नगर येथील स्मशानभूमीत विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिनाचे औचित्य साधून मानव बंधुत्व वेदिकेच्यावतीने एक आंतरजातीय विवाह सोहळा पार पडला. तीर्थकुंडे येथील अनुसूचित जातीचा सोपं बाळकृष्ण जांबोटी आणि बागेवाडी येथील लिंगायत समाजातील रेखा चंद्रप्पा गुरवन्नवर या दोघांचा आंतरजातीय विवाह मान्यवरांच्या उपस्थितीत सदाशिवनगर स्मशानभूमीत पार पडला.

विवाह सोहळ्यानंतर नवदाम्पत्याने अंत्यसंस्कारस्थळी जाऊन चितेवर जळणाऱ्या पार्थिवाचे दर्शन घेऊन आशीर्वाद घेतला.

स्मशानात केवळ राख भरणी दिनी कावळ्याला खाऊ घालण्याची प्रथा आहे. मात्र, स्मशानभूमीतील विवाह सोहळ्यानंतर उपस्थितांसाठी स्मशानभूमीतच भोजनावळीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. आमदार सतीश जारकीहोळी यांच्यासोबत वीरकुमार पाटील, काकासाहेब पाटील, महापौर, उपमहापौर यासह अन्य मान्यवरांनी यावेळी उपस्थित होते.

समाजात मोठ्या प्रमाणात अंधश्रध्येचा पगडा असून, समाजातील अंधश्रद्धा दूर व्हावी, माणूस सज्ञानी व्हावा, यासाठीच मानव बंधुत्व वेदिकेच्यावतीने स्मशानभूमीत विवाह आणि भोजनावळ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.