अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री जेव्हा म्हणतात, “मोदी है तो मुमकीन है”

| Updated on: Jun 13, 2019 | 9:36 PM

शांघाय सहकार्य संघटनेच्या (SCO summit) बैठकीसाठी मोदी विमानात बसण्याच्याआधी अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्र्यांनी स्तुतीसुमने उधळली.

अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री जेव्हा म्हणतात, मोदी है तो मुमकीन है
Follow us on

वॉशिंग्टन : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जादू भारताने पाहिलीच आहे. कारण 2014 नंतर देशाने भाजपला 303 पर्यंत पोहोचवलं. पण आता मोदींची क्रेझ अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या मंत्रिमंडळातही आहे. कारण अमेरिकेचे परराष्ट्रमंत्रीही म्हणतात, “मोदी है तो मुमकीन है”. शांघाय सहकार्य संघटनेच्या (SCO summit) बैठकीसाठी मोदी विमानात बसण्याच्याआधी अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्र्यांनी स्तुतीसुमने उधळली.

अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री माईक पॉम्पिओ पुढच्या आठवड्यात भारताच्या दौऱ्यावर आहेत. त्याआधी त्यांनी निवडणुकीतली भाजपची टॅग लाईन वापरुन सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला. अमेरिका आणि भारतात सध्या व्यापारावरुन वाद सुरु आहे. त्यावर पुढच्या आठवड्यात उपाय शोधण्याचं काम होईल.

पंतप्रधान नरेंद्र मोदी शांघाय सहकार्य संघटनेच्या बैठकीसाठी किर्गिस्तानची राजधानी बिश्केकला पोहोचलेत. यावेळी मोदींनी चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग यांची भेट घेतली. तसंच दोन्ही देशांच्या प्रतिनिधींमध्ये चर्चाही झाली. दोन्ही देशांचे संबंध सुधारण्याबरोबरच जागतिक सुरक्षा आणि व्यापारावर भारताने अधिक भर दिला.

मोदी आणि रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतीन यांचीही भेट झाली. विशेष म्हणजे पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खानही शांघाय सहकार्य संघटनेच्या बैठकीला हजर आहेत. मात्र भारताने इम्रान खान यांचा भेटीचा प्रस्ताव नाकारलाय. एवढंच काय, किर्गिस्तानला जाण्यासाठी मोदींनी पाकिस्तानच्या हवाई मार्गे न जाता ओमान आणि ईराणचा मार्ग निवडला. म्हणजेच मोदींनी शांघाय सहकार्य संघटनेच्या बैठकीतही इम्रान खान आणि त्यांच्या पाकिस्तानला त्यांची जागा दाखवून दिली.