मशिदीतील चोरटे सापडले, नमाजासाठी वाकणाऱ्यांच्या मोबाईलवर डल्ला

| Updated on: Jul 05, 2019 | 4:32 PM

मुंबई: कांदिवली पोलिसांनी दोन भुरट्या चोरांना अटक केली आहे. विशेष म्हणजे हे दोन्ही चोरटे केवळ मशिदीत जाऊन चोरी करत होते. हे चोरटे मशिदीत नमाज पढायला जाणाऱ्या लोकांबरोबर जात आणि त्या ठिकाणची रेकी करत होते. सगळे लोक नमाज पढायला खाली वाकताच, महत्वाचे साहित्य, मोबाईल असणाऱ्या बॅगा घेऊन चोरटे पसार होत होते. सीसीटीव्हीच्या आधारे या चोरट्यांच्या मुसक्या […]

मशिदीतील चोरटे सापडले, नमाजासाठी वाकणाऱ्यांच्या मोबाईलवर डल्ला
Follow us on

मुंबई: कांदिवली पोलिसांनी दोन भुरट्या चोरांना अटक केली आहे. विशेष म्हणजे हे दोन्ही चोरटे केवळ मशिदीत जाऊन चोरी करत होते. हे चोरटे मशिदीत नमाज पढायला जाणाऱ्या लोकांबरोबर जात आणि त्या ठिकाणची रेकी करत होते. सगळे लोक नमाज पढायला खाली वाकताच, महत्वाचे साहित्य, मोबाईल असणाऱ्या बॅगा घेऊन चोरटे पसार होत होते. सीसीटीव्हीच्या आधारे या चोरट्यांच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश आलं आहे.

विशेष म्हणजे चोरी करण्यापूर्वी हे चोरटे अल्लाकडे आम्हाला माफ कर आणि पकडले जाण्यापासून वाचव अशी प्रार्थना करत असल्याची कबुली त्यांनी दिली आहे.

मात्र, यांची हुशारी सीसीटीव्ही कॅमेऱ्यापासून वाचू शकली नाही. कांदिवली पोलिसांनी या दोघांनाही धारावी परिसरातून अटक केली आहे. गुड्डू बुल्लू अंसारी, वय-25 आणि इसरार यूनुस खान, वय 40 अशी त्यांची नावे आहेत.

दोघांनीही कुर्ला , मालवणी, कांदिवली अशा अनेक हायप्रोफाईल मशिदीमध्ये चोऱ्या केल्या आहेत. या दोघांकडून 6 महागडे मोबाईल आणि इतर साहित्य जप्त करण्यात आले असून अधिक तपास सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले.