मोदी सरकारचा मेगा प्लॅन, 1 जानेवारीपासून प्रशिक्षण, 21 दिवसात नोकरी

| Updated on: Mar 03, 2022 | 2:20 PM

नवी दिल्ली: मोदी सरकार नव्या वर्षात जनतेला नवी भेट देण्याच्या तयारीत आहे. विशेषत: मोदी सरकारने बेरोजगारांसाठी नवी योजना आखली आहे. बेरोजगारांना 1 जानेवारीनंतर नोकरी मिळवणं सोपं होईल, अशी योजना मोदी सरकार बनवत आहे. बेरोजगारांना प्रशिक्षण आणि नोकरी असा कार्यक्रम मोदी सरकार सुरु करणार आहे. वरुण मित्र योजनेअंतर्गत हा कार्यक्रम हाती घेण्यात येणार आहे.  महत्त्वाचं म्हणजे […]

मोदी सरकारचा मेगा प्लॅन, 1 जानेवारीपासून प्रशिक्षण, 21 दिवसात नोकरी
कोरोनाच्या जीवघेण्या महामारीमुळे एप्रिलमध्ये देशातील बेरोजगारीचा दर 23.52 टक्क्यांच्या विक्रमी पातळीवर पोहोचला होता. 2020 मध्ये तर ही आकडेवारी सर्वाधिक होती. यानंतर कृषी क्षेत्रात झालेल्या सुधारणेमुळे सप्टेंबर ते ऑक्टोबर या काळात बेरोजगारीचं प्रमाण कमी होऊ लागल्याचं दिसून आलं.
Follow us on

नवी दिल्ली: मोदी सरकार नव्या वर्षात जनतेला नवी भेट देण्याच्या तयारीत आहे. विशेषत: मोदी सरकारने बेरोजगारांसाठी नवी योजना आखली आहे. बेरोजगारांना 1 जानेवारीनंतर नोकरी मिळवणं सोपं होईल, अशी योजना मोदी सरकार बनवत आहे. बेरोजगारांना प्रशिक्षण आणि नोकरी असा कार्यक्रम मोदी सरकार सुरु करणार आहे. वरुण मित्र योजनेअंतर्गत हा कार्यक्रम हाती घेण्यात येणार आहे.  महत्त्वाचं म्हणजे यासाठी कोणतंही शुल्क द्यावं लागणार नाही.

काय आहे वरुण मित्र योजना?

नवीन आणि नूतनीकरणक्षम ऊर्जा मंत्रालय आणि राष्ट्रीय सौर ऊर्जा संस्था याअंतर्गत मोदी सरकारने या कार्यक्रमाची आखणी केली आहे. त्यालाच सोलर वॉटर पम्पिंग ‘वरुण मित्र’ कार्यक्रम संबोधलं आहे.  याच्या प्रशिक्षणानंतर तुम्हाला चांगली नोकरी मिळू शकते.

हे प्रशिक्षण 1 ते 19 जानेवारी 2019 या दरम्यान होईल. यामध्ये 120 तास प्रशिक्षण दिलं जाईल.  या प्रशिक्षणात सहभागी होण्यासाठी तुम्हाला 28 डिसेंबरपर्यंत अर्ज करावा लागणार आहे.

सरकारचा उद्देश काय?

सोलर सिस्टिम अर्थात सौर यंत्राबाबत नागरिकांमध्ये जागरुकता निर्माण व्हावी हा सरकारचा उद्देश आहे. यामध्ये ऊर्जेचा पुनर्वापर, सौर संसाधनं, सोलर वॉटर पम्प यासह  डीटी कन्वर्टर, इन्वर्टर, बॅटरी, मोटर्स, पम्प मोटर, इंस्टॉलेशन ऑफ ग्रिड अँड स्टँड अलोन सोलर पीवी वॉटर पम्पिंग सिस्टम इत्यादींचा समावेश आहे. याशिवाय सोलर पीव्ही वॉटर पम्पिंग सिस्टिमसाठी सेफ्टी प्रॅक्टिस, ऑपरेशन अँड मेंटेनन्स, टेस्टिंग याबाबतचीही माहिती दिली जाईल.

प्रशिक्षण कसं होईल?

या कार्यक्रमांतर्गत वेगवेगळे प्रशिक्षणाचे धडे दिले जातील. यामध्ये क्लासरुम लेक्चरशिवाय प्रॅक्टिकल, फिल्ड आणि इंडस्ट्रियल व्हिजीटही या प्रात्यक्षिकाचा भाग असेल. हे प्रशिक्षण फुकट देण्यात येणार आहे, मात्र जर तुम्ही वसतिगृहात राहणार असाल, तर तुम्हाला 600 रुपये प्रति दिन असं भरावे लागतील.

हे प्रशिक्षण इलेक्ट्रॉनिक, मेकॅनिकल, डिप्लोमा होल्डर्स, ग्रॅज्युएट इंजिनियर, सोलर, पीएससू अधिकारी यांच्यासाठी फायद्याचं ठरेल.

अॅप्लाय कसं करायचं?

या प्रशिक्षणासाठी 28 डिसेंबरपर्यंत varunmitra.nise@gmail.com आणि startups.nise@gmail.com यावर मेल करावा लागेल. हा फॉर्म पुढील लिंकवरुन डाऊनलोड करु शकता –    अधिक माहितीसाठी पंतप्रधान कार्यालयाच्या वेबसाईटला लॉग ऑन करा.