निवडणुकीत मटणाला महागाईची फोडणी

| Updated on: Jul 05, 2019 | 4:09 PM

नागपूर : लोकसभा निवडणुकीचं वातावरण तापायला लागलं आहे. कार्यकर्तेही आपल्या नेत्यांच्या प्रचारात व्यस्त आहेत. दिवसभर प्रचार करायचा अणि रात्री मटण-चिकनवर ताव मारायचा. निवडणुकीच्या काळात अनेक ठिकाणी असं चित्र दिसतं. या राजकीय खानावळीमुळेच सध्या चिकन आणि मटणच्या दरात वाढ झाल्याचे दिसत आहे. मटण-चिकनची मागणी वाढल्याने  नागपुरात मटण 500 ते 520 रुपये किलोपर्यंत महाग झालं आहे. तसेच […]

निवडणुकीत मटणाला महागाईची फोडणी
Follow us on

नागपूर : लोकसभा निवडणुकीचं वातावरण तापायला लागलं आहे. कार्यकर्तेही आपल्या नेत्यांच्या प्रचारात व्यस्त आहेत. दिवसभर प्रचार करायचा अणि रात्री मटण-चिकनवर ताव मारायचा. निवडणुकीच्या काळात अनेक ठिकाणी असं चित्र दिसतं. या राजकीय खानावळीमुळेच सध्या चिकन आणि मटणच्या दरात वाढ झाल्याचे दिसत आहे. मटण-चिकनची मागणी वाढल्याने  नागपुरात मटण 500 ते 520 रुपये किलोपर्यंत महाग झालं आहे. तसेच चिकनच्या दरातही वाढ झाली आहे.

नागपुरात मटणाचे दर पूर्वी 460 रुपये किलो होते. आता मागणी वाढल्याने मटण 500 ते 520 रुपये किलोवर गेले आहे, तर चिकन 70 ते 100 रुपयापर्यंत गेलं आहे. निवडणुकीच्या काळात हॉटेलकडूनंही मटण-चिकनची मागणी वाढल्याने दरवाढीवर परिणाम झाला आहे. यामुळे नागपूरकरांना हॉटेलमध्ये मटण-चिकन खाणे महागात पडत असल्याचे दिसत आहे.

निवडणूक म्हटली तर प्रत्येक नेत्याला कार्यकर्त्यांची गरज भासते, तर कार्यकर्त्यांनाही नेत्यांची गरज भासते. निवडणुकीतील प्रचार रॅलीत माणसं गोळा करणे, सभा आयोजित करणे यासर्वांसाठी कार्यकर्त्यांची गरज प्रत्येक नेत्याला लागते. यामुळे कार्यकर्त्यालाही खूश ठेवणं हे नेत्यांचं काम असतं.  दिवसभर प्रचार करुन झाले की, अनेक पक्षातील कार्यकर्ते संध्याकाळी आपल्या विभागातील एखाद्या हॉटेलमध्ये जेवण्यासाठी जातात. बऱ्याचदा येथे मटण आणि चिकनसारखे पदार्थ ऑर्डर केले जातात. यामुळे प्रत्येक हॉटेल मालक मटण-चिकनची वाढती मागणी बघता त्यांनी आपल्या दरात वाढ केली आहे.

लोकसभेच्या मतदानाचा पहिला टप्पा नागपुरात सुरु होणार आहे. येत्या 11 एप्रिल रोजी नागपुरात मतदान पार पडणार आहे. नागपूर लोकसभा मतदारसंघात काँग्रेसकडून नाना पाटोले आणि भाजपकडून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी निवडणुकीच्या मैदानात उतरले आहेत. यामुळे नागपूरमध्ये या दोन्ही तगड्या उमेदवारांमध्ये कडवी लढत होणार आहे.