गेल्या पाच वर्षात मिळालेली स्मृती चिन्हं मोदींनी विकायला काढली!

| Updated on: Jul 05, 2019 | 4:32 PM

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना विविध कार्यक्रमांदरम्यान जे स्मृती चिन्ह मिळाले आहेत, त्यांचा रविवार आणि सोमवारी लिलाव केला गेला. उर्वरित वस्तूंचा www.pmmementos.gov.in या वेबसाईटवरुन ई-लिलाव केला जाणार असून, मंगळवारपासून 31 जानेवारीपर्यंत हा ऑनलाईन लिलाव सुरु राहील. या स्मृती चिन्हांच्या विक्रीतून मिळणारे पैसे गंगा स्वच्छता अभियानासाठी सुरु करण्यात आलेल्या ‘नमामि गंगे’ उपक्रमासाठी वापरण्यात येणार […]

गेल्या पाच वर्षात मिळालेली स्मृती चिन्हं मोदींनी विकायला काढली!
Follow us on

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना विविध कार्यक्रमांदरम्यान जे स्मृती चिन्ह मिळाले आहेत, त्यांचा रविवार आणि सोमवारी लिलाव केला गेला. उर्वरित वस्तूंचा www.pmmementos.gov.in या वेबसाईटवरुन ई-लिलाव केला जाणार असून, मंगळवारपासून 31 जानेवारीपर्यंत हा ऑनलाईन लिलाव सुरु राहील. या स्मृती चिन्हांच्या विक्रीतून मिळणारे पैसे गंगा स्वच्छता अभियानासाठी सुरु करण्यात आलेल्या ‘नमामि गंगे’ उपक्रमासाठी वापरण्यात येणार आहे.

पेंटिंग्ज, फोटोग्राफ, क्राफ्ट, शाल, जॅकेट्स, पगड्या, पुतळे, शिल्प, चांदीच्या वस्तू, लाकडाच्या वस्तू इत्यादींचा या स्मृती चिन्हांमध्ये समावेश आहे. या वस्तूंची सुरुवातीची किंमत एक हजार रुपये ठेवण्यात आली होती. मात्र, अनेक वस्तू 20 हजाराहून अधिक रुपयांना खरेदी करण्यात आल्या.

“हे पैशासाठी नाहीय. नमामि गंगासारख्या चांगल्या उपक्रमासाठी या पैशाचा वापर होईल. मोदींना मिळालेले हे स्मृती चिन्ह खरेदी करणे माझ्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे.”, असे स्मृती चिन्ह खरेदी करणाऱ्या अमित कुमार यांनी एएनआयशी बोलताना सांगितले.

नॅशनल गॅलरी ऑफ मॉडर्न आर्ट्सचे संचालक अद्वैता चरण गरनायक यांच्या माहितीनुसार, “ही स्मृती चिन्ह खरेदी करण्यासाठी प्रचंड प्रतिसाद मिळतो आहे. जी मूळ रक्कम सांगितली जाते, तिच्या सुमारे 15 पट जास्त रक्कम देऊन खरेदी केले जात आहे. वस्तू काय आहे, यापेक्षा त्यासोबतची भावना पाहिली जात आहे. एकतर पंतप्रधान मोदींशी हे स्मृती चिन्ह जोडले आहेत, दुसरे गंगा स्वच्छतेसाठी रक्कम वापरली जाणार आहे.”

या स्मृती चिन्हांमधील स्वामी विवेकानंद यांची छोटीशी मूर्ती तब्बल 30 हजार रुपयांना खरेदी केली गेली. हिंदू सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष सुरजीत यादव यांनी दोन दिवसात दोन लाख रुपयांच्या वस्तू खरेदी केल्या. सुरजीत यादव हे या वस्तू शाळांना दान स्वरुपात देणार आहेत.