EXCLUSIVE | देशासाठी एकत्र येण्याची गरज, रोहित पवारांची प्रतिक्रिया, मोदींच्या पाठिंब्यावर ठाम?

| Updated on: Apr 04, 2020 | 7:14 PM

आमदार रोहित पवार (Rohit Pawar on Narendra Modi TV9 Exclusive) यांचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेला पाठिंबा कायम असल्याचं दिसतंय.

EXCLUSIVE | देशासाठी एकत्र येण्याची गरज, रोहित पवारांची प्रतिक्रिया, मोदींच्या पाठिंब्यावर ठाम?
Follow us on

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar on Narendra Modi TV9 Exclusive) यांचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेला पाठिंबा कायम असल्याचं दिसतंय. कारण जो व्यक्ती देशासाठी एकत्रित येण्याचं सांगेल, त्याच्या मागे उभं राहावं लागेल, असं रोहित पवार म्हणाले. रोहित पवार यांनी आज टीव्ही 9 मराठीशी एक्स्क्लुझिव्ह संवाद साधला. त्यावेळी त्यांनी विविध विषयांवर भाष्य केलं. (Rohit Pawar on Narendra Modi TV9 Exclusive)

“मोदींच्या भाषणात कोरोनाबाबत काही नव्हतं त्यामुळे त्यांच्यावर टीका झाली. लाईट बंद करुन तांत्रिकदृष्ट्या फटका बसणार असेल तर सामान्य नागरिक म्हणून मला ते मान्य नाही, पण देशासाठी संघटित होणे आवश्यक आहे. आज जो कोणी देशाला एकत्रित येण्याचं सांगेल, त्याला पाठिंबा देणे आवश्यक आहे.” असं रोहित पवार म्हणाले.

नैराश्य पसरलं आहे, निगेटिव्ह वातावरण आहे. दिवे लावल्यास पॉझिटिव्ह वाटेल, सर्वांनी एकत्र काहीतरी करतोय असं वाटेल, असा मोदींचा विचार असावा तो योग्य वाटतो का? असा प्रश्न रोहित पवार यांना विचारण्यात आला.

त्यावर रोहित पवार म्हणाले, “एकत्र येण्याचा, युनिटीचा, एका विचाराने देशासाठी उभं राहिलं पाहिजे हा विचार माझ्यासारख्याला योग्य वाटतो. मात्र आज ज्यांच्याकडे पदं आहेत, मंत्री आहेत, ज्यांना लोकांच्या अडचणी सोडवायच्या आहेत, त्याबाबत मोदींच्या भाषणात काही नव्हतं. म्हणून त्याबाबत वाद झाला. व्यक्तीगत या देशाचा नागरिक म्हणून तुम्ही मला विचाराल, तर आज देशासाठी एकत्र येण्याची गरज आहे. त्याबाबत मुख्यमंत्री साहेबांनी आवाहन केलेलं आपण पाहिलं, काल पंतप्रधानांनी आवाहन केलं, सातत्याने पवारसाहेब बोलतच आहेत. त्यामुळे जो कोणी व्यक्ती आज देशाला एकत्रित यायला सांगेल, त्याच्या पाठीमागे आपल्या सर्वांना उभं राहावं लागेल. ती व्यक्ती म्हणते म्हणून नाही, तर देशासाठी एकत्र येण्याची गरज आहे”.

देशात दिवसेंदिवस कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारकडून अनेक प्रयत्न केले जात आहेत. पण काल (3 एप्रिल) झालेल्या मोदींच्या भाषणावर कोरोनाबाबत एकही मुद्दा नसल्यामुळे महाराष्ट्रातल्या नेत्यांनी त्यांच्यावर टीका केली आहे. त्याबाबतही रोहित पवारांनी भाष्य केलं.

रोहित पवार म्हणाले, “मोदींच्या भाषणात कोरोनाबाबत काही नव्हतं त्यामुळे त्यांच्यावर टीका झाली, पण आज जो कोणी देशाला एकत्रित येण्याचं सांगेल, त्याला पाठिंबा देणे आवश्यक आहे.”

“लाईट बंद करुन तांत्रिकदृष्ट्या फटका बसणार असेल तर सामान्य नागरिक म्हणून मला ते मान्य नाही, पण संघटित होणे आवश्यक आहे, टेक्निकल बाजूचा विचार आम्ही केला नव्हता, असंही रोहित पवार यांनी स्पष्ट केलं.

“मरकजमध्ये जो कार्यक्रम झाला त्यामुळे काय झाले हे सर्वांना माहित आहे. कुठलाही धार्मिक कार्यक्रम झाला नाही पाहिजे याबाबत मुख्यमंत्र्यांनी सतत आवाहन केले आहे”, असंही रोहित पवार यांनी सांगितले.

रोहित पवार म्हणाले, “बहुतांश लोक सरकारच्या आवाहनला प्रतिसाद देत आहेत, दोन प्रकारचे लोक रस्त्यावर आहेत, एक म्हणजे ज्याला काहीच कळत नाही, देशाचं काही पडलेलं नाही असे आणि दुसरं म्हणजे गरजवंत, ज्यांना औषधं, अन्नधान्याची खरंच गरज आहे ते लोक.”

“लॉकडाऊनमध्ये मी घरात आहे. सकाळपासून माझे फोन सुरु असतात. मतदरासंघातील काही प्रश्न, युवक, विद्यार्थी, शेतकऱ्यांचे प्रश्न मी मंत्र्यांपर्यंत नेत आहे. त्यासोबत सर्वांनी घरात राहावे”, असं आवाहनही रोहित पवार यांनी केले.

“आज घराची पर्वा न करता डॉक्टर, पोलीस, नर्स घराबाहेर आहेत त्यांच्यासाठी आपण घरात राहणे गरजेचे आहे. मी तरुणांना हेच आवाहन करेन की सर्वांनी घरी बसा”, असं रोहित पवार म्हणाले.

“डॉक्टर नर्स किंवा पोलिसांवर जो कुणी हल्ला करेल, तो खपवून घेतला जाणार नाही, असा इशारा त्यांनी दिला. सुदैवाने इतर देशांच्या तुलनेने आपण या आजाराला कंट्रोल केले आहे, असा दावा त्यांनी केला.

कोरोनामुळे आर्थिक परिस्थिती डबघाईला येईल, त्याबाबत उपाययोजना काय? असा प्रश्न रोहित पवार यांना विचारण्यात आला. त्यावर ते म्हणाले, “अशा अनेक कंपन्या आहेत ज्यांना चायना सोडून इतर देशात जायचं आहे, जर त्या महाराष्ट्रात आल्या तर रोजगार निर्माण होईल”,

भाडेकरुंना सवलत द्या

यावेळी रोहित पवारांनी भाडेकरुंबाबतही भाष्य केलं. “दोन प्रकारचे भाडे असतात, एक म्हणजे राहण्यासाठी दिलेलं घर किंवा दुकानगाळा वगैरे. हा व्यक्तीगत मालक आणि भाडेकरुचा प्रश्न आहे. माझी अशी विनंती आहे की घरमालकांनी विचार करुन, जे विद्यार्थी, स्पर्धा परीक्षा तयारी करणारे तरुण आहेत, अशांना घरमालकांनी तीन महिन्याची सूट द्यावी.

दुसरा मुद्दा महापालिका, जिल्हा परिषद, नगरपरिषद यांचे जे गाळे आहेत, ते गाळे भाड्याने दिले असतील, तर त्यामध्येही सूट देण्याची गरज आहे”, असं रोहित पवार म्हणाले.