शेतकऱ्यांना दर महिन्याला पेन्शन मिळणार, लवकरच नवी योजना

| Updated on: Jul 05, 2019 | 4:44 PM

सांगली : अटल पेन्शन योजनेच्या धर्तीवर राज्यातील शेतकऱ्यांना दरमहा काही ठराविक रक्कम पेन्शन म्हणून देण्याची योजना सरकार लवकरच आणणार आहे, अशी माहिती राज्याचे महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली. ते सांगली जिल्ह्यात विटा येथे बळीराजा कृषी प्रदर्शनाचे उद्घाटन प्रसंगी बोलत होते. शेतीतील आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती लोकांना व्हावी म्हणून हे प्रदर्शन भरवण्यात आला आहे हे प्रदर्शन चार दिवस […]

शेतकऱ्यांना दर महिन्याला पेन्शन मिळणार, लवकरच नवी योजना
Follow us on

सांगली : अटल पेन्शन योजनेच्या धर्तीवर राज्यातील शेतकऱ्यांना दरमहा काही ठराविक रक्कम पेन्शन म्हणून देण्याची योजना सरकार लवकरच आणणार आहे, अशी माहिती राज्याचे महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली. ते सांगली जिल्ह्यात विटा येथे बळीराजा कृषी प्रदर्शनाचे उद्घाटन प्रसंगी बोलत होते. शेतीतील आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती लोकांना व्हावी म्हणून हे प्रदर्शन भरवण्यात आला आहे हे प्रदर्शन चार दिवस सर्वांसाठी खुले राहणार आहे.

नोकरदार लोकांना ज्याप्रमाणे काही ठराविक रक्कम मिळते, त्याच पद्धतीने शेतकरी कुटुंबासाठी निरंतर पैशाची व्यवस्था झाली पाहिजे, अशी सरकारची भूमिका आहे. त्यासाठी दहा हजाराच्या पटीत काही रक्कम गुंतवावी लागणार आहे. त्यात दहा टक्के रक्कम स्वतःची घालून सरकार शेतकऱ्यांच्या पत्नीच्या नावावर बँक खात्यात पाठवणार आहे. याबाबतची प्राथमिक तयारी सध्या सुरू आहे, अशी माहिती चंद्रकांत पाटील यांनी दिली.

दरम्यान, आतापर्यंत राज्यातील 27 लाख शेतकरी विमा घेत होते. या वर्षी 87 लाख शेतकरी पीक विमा योजनेत सहभागी झाले आहेत. आजवर 300 कोटी रुपये भरपाई मिळत होती. यावर्षी 2900 कोटी रुपये भरपाई म्हणून मिळाले आहेत, असेही चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.