वर्ध्यातील मायलेकीची NIA कडून सलग दुसऱ्या दिवशी चौकशी

| Updated on: Jul 05, 2019 | 4:00 PM

वर्धा : वर्ध्याच्या म्हसाळा परिसरातील एका घरावर एनआयएकडून शनिवारी छापेमारी करत चौकशीसाठी एका युवतीसह आईला ताब्यात घेण्यात आले होते. युवती एनआयएने काल दिवसभर चौकशी करत सोडले होते. मात्र आज सकाळी दहा वाजतापासून परत चौकशीला सुरुवत करण्यात आलीय. युवती ही मागील दोन वर्षापासून वर्ध्यात वास्तव्यास होती. हैद्राबाद येथून आजच सकाळी युवती परतली होती. दरम्यान एनआयए कडून […]

वर्ध्यातील मायलेकीची NIA कडून सलग दुसऱ्या दिवशी चौकशी
Follow us on

वर्धा : वर्ध्याच्या म्हसाळा परिसरातील एका घरावर एनआयएकडून शनिवारी छापेमारी करत चौकशीसाठी एका युवतीसह आईला ताब्यात घेण्यात आले होते. युवती एनआयएने काल दिवसभर चौकशी करत सोडले होते. मात्र आज सकाळी दहा वाजतापासून परत चौकशीला सुरुवत करण्यात आलीय. युवती ही मागील दोन वर्षापासून वर्ध्यात वास्तव्यास होती. हैद्राबाद येथून आजच सकाळी युवती परतली होती. दरम्यान एनआयए कडून छापेमारी करत युवतीसह तिच्या आईला ताब्यात घेण्यात आले होते.

काल 13 तासाच्या चौकशीत नेमकं काय पुढे आले हे अजूनही गुलदस्त्यात आहे. पोलिसांकडून याबाबत कमालीची गुप्तता पाळली जात आहे. मागील वर्षी ऑगस्ट महिन्यापासून तिहार तुरुंगात असलेल्या आणि इसिसचे कनेक्शन असलेल्या एका आरोपीची पत्नी असल्याच बोलल जातंय.

शनिवारी पहाटे पाच वाजताच्या सुमारास म्हसाळा येथील ज्ञानेश्वर नगरमध्ये राहणाऱ्या व्यक्तीच्या घरी दिल्लीची राष्ट्रीय चौकशी एजन्सीची टीम पोहचली. नेमकं काय झालं याचा धसका घेतलेल्या घरमालकाने विचारणा केली. त्यांच्याकडे राहत असणाऱ्या मुस्लिम महिलेकडे ही पोलिसांची टीम पोहचली होती. एनआयएच्या टीमने सकाळीच हैद्राबादवरुन घरी पोहचलेल्या 23 वर्षीय युवतीला पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले. युवती आणि तिच्या आईला ताब्यात घेत सेवाग्राम पोलिस स्टेशनमध्ये कसून चौकशी करण्यात येत आहे. यात कमालीची गुप्तता पाळण्यात आली .

दोन वर्षापासून म्हसाळा येथे राहणाऱ्या युवतीचे  इसिसशी काय संबंध आहे हे पडताळून पाहिले जात आहे. युवती बाहेर राहायची. घरी तिचे येणे-जणे असायचे, घरमालकाने दिलेल्या माहितीनुसार, हा परिवार गेल्या सात वर्षांपासून वर्ध्यात वास्तव्यास आहे.

पोलिसांनी समाजमाध्यमातून दहशतवादाला प्रोत्साहन देणाऱ्या तिघांना 2016 मध्ये अटक केली होती. त्यातीलच तिहार तुरुंगात असणाऱ्या आरोपीशी संबंधित असणाऱ्या वर्ध्यातील युवतीला पोलिसांनी शनिवारी चौकशीसाठी ताब्यात घेतले.