नाशकात महिला दिनी वाटलेल्या मोबाईलमध्ये अश्लिल व्हिडीओ

| Updated on: Jun 22, 2021 | 3:16 PM

नाशिक : नाशिक आणि मालेगाव महापालिकेच्या महिला कर्मचाऱ्यांना आरोग्य प्रशिक्षणादरम्यान वाटण्यात आलेल्या मोबाईलमध्ये अश्लील फोटो आणि व्हिडिओ आढळल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. विशेष म्हणजे महिला दिनाच्या पूर्वसंध्येलाच हा धक्कादायक प्रकार उघडकीस आल्याने एकच खळबळ माजली. याप्रकरणी पोलिसांनी अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल केला आहे. केंद्र सरकारच्या संलग्न असलेल्या एका सामाजिक संस्थेकडून हे मोबाईल आरोग्य विभागाच्या महिलांना […]

नाशकात महिला दिनी वाटलेल्या मोबाईलमध्ये अश्लिल व्हिडीओ
Follow us on

नाशिक : नाशिक आणि मालेगाव महापालिकेच्या महिला कर्मचाऱ्यांना आरोग्य प्रशिक्षणादरम्यान वाटण्यात आलेल्या मोबाईलमध्ये अश्लील फोटो आणि व्हिडिओ आढळल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. विशेष म्हणजे महिला दिनाच्या पूर्वसंध्येलाच हा धक्कादायक प्रकार उघडकीस आल्याने एकच खळबळ माजली. याप्रकरणी पोलिसांनी अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

केंद्र सरकारच्या संलग्न असलेल्या एका सामाजिक संस्थेकडून हे मोबाईल आरोग्य विभागाच्या महिलांना वाटण्यात आले होते. शासनाकडून वाटण्यात आलेल्या मोटोरोला कंपनीच्या 38 पैकी 6 नव्या कोऱ्या मोबाईलमध्ये अश्लील व्हिडिओ आणि फोटो आढळून आले आहेत. या प्रकरणी मुंबई नाका पोलीस ठाण्यात आयटीअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलं असून पोलीस या प्रकरणाची अधिक चौकशी करत आहेत.

ज्या मोबाईलमध्ये अश्लील व्हिडीओ आहेत. सर्व मोबाईल पोलिसांनी जप्त केले आहेत. सरकारच्या संलग्न असलेल्या एका सामजिक संस्थेकडून लसीकरण मोहीम संदर्भात आरोग्य विभागाच्या महिलांना प्रशिक्षण देण्यात येतं. लसीकरण मोहीम राबवण्यासाठी या महिलांना हे मोबाईल वाटण्यात आले होते. या घटनेमुळे महिला वर्गात संताप व्यक्त होतो आहे.

नाशिक जिल्ह्यात 38 मोबाईल वाटण्यात आले होते, तर संपूर्ण राज्यात किती मोबाईल वाटण्यात आले होते आणि किती मोबाईलमध्ये अशा प्रकारच्या अश्लील व्हिडीओ आढळले आहेत, या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी आता विरोधक करत आहेत. तसेच नव्या कोऱ्या मोबाईलमध्ये अशा प्रकारचे अश्लील व्हिडिओ कोणी डाऊनलोड केले हा देखील एक प्रश्न उपस्थित होतो आहे.