राज्यातील धरणांमध्ये फक्त 38 टक्केच पाणीसाठा, मराठवाड्यात भीषण स्थिती

| Updated on: Jul 05, 2019 | 4:29 PM

नागपूर : हिवाळा जवळपास संपत आलाय आणि उन्हाळ्याची चाहूल लागलीय. पण उन्हाळ्याची चाहूलच राज्यात पाणीटंचाई घेऊन आल्याची स्थिती सध्या महाराष्ट्रात आहे. राज्यातील धरणांमध्ये सध्या 38 टक्केच पाणीसाठा शिल्लक आहे. नागपूर विभागातील सहा जिल्ह्यातील धरणांमध्ये अवघा 19 टक्केच, तर औरंगाबाद विभागात अवघा 11 टक्केच पाणीसाठा शिल्लक आहे. या पाण्यावर साडेपाच महिने राज्याची तहान कशी भागणार हा […]

राज्यातील धरणांमध्ये फक्त 38 टक्केच पाणीसाठा, मराठवाड्यात भीषण स्थिती
Follow us on

नागपूर : हिवाळा जवळपास संपत आलाय आणि उन्हाळ्याची चाहूल लागलीय. पण उन्हाळ्याची चाहूलच राज्यात पाणीटंचाई घेऊन आल्याची स्थिती सध्या महाराष्ट्रात आहे. राज्यातील धरणांमध्ये सध्या 38 टक्केच पाणीसाठा शिल्लक आहे. नागपूर विभागातील सहा जिल्ह्यातील धरणांमध्ये अवघा 19 टक्केच, तर औरंगाबाद विभागात अवघा 11 टक्केच पाणीसाठा शिल्लक आहे. या पाण्यावर साडेपाच महिने राज्याची तहान कशी भागणार हा सर्वात मोठा प्रश्न आहे.

राज्यातील जनतेला आणि सरकारलाही चिंता करायला लावणारी ही जलसंपदा विभागाची आकडेवारी… सध्या राज्यातील धरणात अवघा 38 टक्केच पाणीसाठा उरलाय. या पाण्यात पुढील साडेपाच महिने राज्यातील जनतेची तहान कशी भागणार? हा सर्वात मोठा प्रश्न आहे. राज्यात यंदा भीषण दुष्काळ आहे, त्यामुळे धरणांमध्ये गेल्यावर्षीच्या तुलनेत 16 टक्के कमी पाणी आहे.

राज्यातील धरणांमधील विभागवार पाणीसाठा

विभाग         पाणीसाठा       गेल्यावर्षीचा पाणीसाठा

अमरावती       36 टक्के           27 टक्के

औरंगाबाद       11 टक्के           48 टक्के

नागपूर          19 टक्के          25 टक्के

नाशिक          35 टक्के          58 टक्के

पुणे             53 टक्के          68 टक्के

कोकण          61 टक्के           67 टक्के

एकूण            38 टक्के           54 टक्के

नागपूर विभागातील सहा जिल्ह्यात सध्या अवघा 11 टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. नागपूर शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणात अवघा 34 टक्केच पाणीसाठा शिल्लक आहे. राज्याची उपराजधानीत सध्या रोज 650 दशलक्ष लिटर पाण्याची गरज आहे. 30 लाख लोकांची तहान भागवण्यासाठी नागपूरला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणातही कमी पाणीसाठा आहे. त्यामुळेच जपून पाणी वापरण्याचा सल्ला दिला जातोय.

सध्या राज्याच्या अनेक भागात भीषण पाणीटंचाई आहे. विदर्भातील यवतमाळ, अकोला, वर्धा आणि नागपूरच्या काही भागातही पाणीटंचाईची सुरुवात झाली आहे. मराठवाड्यात तर परिस्थिती भीषण आहे. उन्हाळ्याच्या तीव्रतेनुसार हे जलसंकट आणखी तीव्र होणार आहे. त्यामुळे पाणीसंकटामुळे लोकांच्या डोळ्यात पाणी येण्याआधी प्रशासनाचं पाणी तहानलेल्यांपर्यंत पोहोचण्याची खरी गरज आहे.