श्रीदेवीच्या फोटोवरुन पाकिस्तानी अभिनेत्याचा माफीनामा

| Updated on: Jul 05, 2019 | 4:19 PM

मुंबई : पुलवामा हल्ल्यामुळे सध्या भारत-पाक या दोन्ही देशातील वातावरण तणावाचे आहे. याचदरम्यान पाकिस्तानी अभिनेता अदनाम सिद्दिकीने अभिनेत्री श्रीदेवी यांचा फोटो आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर पोस्ट केला. फोटो पोस्ट केल्यावर पाकिस्तानी इंटरनेट युजर्सकडून मोठ्या प्रमाणात अदनामवर टीका करण्यात आली. मात्र यानंतर अभिनेता अदनामने श्रीदेवी यांचा फोटो हटवत सर्वांची माफी मागितली. मॉम चित्रपटात अदनामने सहकलाकार म्हणून श्रीदेवी […]

श्रीदेवीच्या फोटोवरुन पाकिस्तानी अभिनेत्याचा माफीनामा
Follow us on

मुंबई : पुलवामा हल्ल्यामुळे सध्या भारत-पाक या दोन्ही देशातील वातावरण तणावाचे आहे. याचदरम्यान पाकिस्तानी अभिनेता अदनाम सिद्दिकीने अभिनेत्री श्रीदेवी यांचा फोटो आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर पोस्ट केला. फोटो पोस्ट केल्यावर पाकिस्तानी इंटरनेट युजर्सकडून मोठ्या प्रमाणात अदनामवर टीका करण्यात आली. मात्र यानंतर अभिनेता अदनामने श्रीदेवी यांचा फोटो हटवत सर्वांची माफी मागितली.

मॉम चित्रपटात अदनामने सहकलाकार म्हणून श्रीदेवी यांच्यासोबत काम केलं होतं. सिद्दिकीने 24 फेब्रुवारी रोजी श्रीदेवींच्या पुण्यतिथी दरम्यान त्यांचा एक फोटो इन्स्टाग्राम अकाऊंटवर पोस्ट करत त्यांना श्रद्धांजली वाहिली. मात्र या पोस्टला पाकिस्तानी युजर्सकडून विरोध करण्यात आला. या विरोधानंतर अदनामने श्रीदेवी यांचा फोटो काढून टाकत माफी मागितली.

“माझी आधीची पोस्ट व्यक्तीगत होती. मी माझ्या सहकलाकारांची आठवण म्हणून मी तो फोटो पोस्ट केला होता. मात्र मला माझ्या चुकीची जाणीव झाली. मी माझ्या देशाचे समर्थन करतो. सन्मान आणि भावनांचा विचार करुन मी पोस्ट डिलीट करत आहे”, असं अदनाम सिद्दिकी याने आपल्या दुसऱ्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.

सिद्दिकी म्हणाला, मी एक पाकिस्तानी आहे. त्याचा मला अभिमान आहे. कधीही मला कोणतीही एक गोष्ट निवडायला सांगितली, तर पहिले मी माझ्या देशाला पसंती देईन. मला वाटतं की श्रीदेवी यांच्या पोस्टसाठी ही योग्य वेळ नव्हती यासाठी मी माफी मागतो.

दरम्यान पुलवामा हल्ल्यानंतर भारतात पाकिस्तानविरुद्ध रोष व्यक्त केला जात आहे. पुलवामा इथे झालेल्या हल्ल्यात भारताचे 40 जवान शहीद झाले होते. यानंतर भारत-पाकमध्ये तणावाचे वातावरण दिसत आहे. दरम्यान या हल्ल्याचा निषेध संपूर्ण देशाने केला, तसेच बॉलिवूड कलाकारांनी या घटनेचा निषेध केला. पाकिस्तानी कलाकारांना भारतीय चित्रपटात न घेण्याचा इशाराही भारतीय जनेतेने दिला आहे.