मंत्रालयात प्रवेश न करण्याची घोषणा, पंकजा मुंडेंचा यू टर्न

| Updated on: Jul 05, 2019 | 4:43 PM

मुंबई : धनगर आरक्षणप्रश्नी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रामराव वडकुते यांनी ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांना मंत्रालयाच्या मुख्य प्रवेशद्वारावर रोखलं. धनगर आरक्षण मिळेपर्यंत मी मंत्रालयात प्रवेश करणार नाही, अशी घोषणा पंकजा मुंडे यांनी नांदेड जिल्ह्यात केली. पण दुसऱ्याच दिवशी त्या मंत्रालयात गेल्यानंतर राष्ट्रवादीचे आमदार रामराव वडकुते यांनी त्यांना रोखलं. आपण असं वक्तव्य केलंच नसल्याचं स्पष्टीकरण पंकजा यांनी […]

मंत्रालयात प्रवेश न करण्याची घोषणा, पंकजा मुंडेंचा यू टर्न
Follow us on

मुंबई : धनगर आरक्षणप्रश्नी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रामराव वडकुते यांनी ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांना मंत्रालयाच्या मुख्य प्रवेशद्वारावर रोखलं. धनगर आरक्षण मिळेपर्यंत मी मंत्रालयात प्रवेश करणार नाही, अशी घोषणा पंकजा मुंडे यांनी नांदेड जिल्ह्यात केली. पण दुसऱ्याच दिवशी त्या मंत्रालयात गेल्यानंतर राष्ट्रवादीचे आमदार रामराव वडकुते यांनी त्यांना रोखलं.

आपण असं वक्तव्य केलंच नसल्याचं स्पष्टीकरण पंकजा यांनी दिलंय. ‘आम्ही पुन्हा सत्ता प्रस्थापित करणार आहोत पण त्या सत्तेत विराजमान होत असताना धनगर आरक्षण दिल्याशिवाय मंत्रालयात प्रवेश करू शकणार नाही’ या माझ्या वक्तव्यावर मी ठाम आहे. माझ्या वक्तव्याचा विपर्यास करण्यात आला, असं पंकजा मुंडे यांनी म्हटलंय. वाचापंकजा मुंडेंना मंत्रालयाच्या गेटवर रोखणारे रामराव वडकुते कोण?

आमदार रामराव वडकुते यांनी मला रोखण्यापेक्षा गेल्या 70 वर्षात जे धनगरांना आरक्षण देऊ शकले नाहीत त्यांना रोखावं. ते ज्या राष्ट्रवादी पक्षाचे आमदार आहेत त्यांनी का नाही धनगरांना आरक्षण दिले? मला रोखल्याने धनगर आरक्षण मिळणार असेल तर मला खुशाल रोखावं, असंही पंकजा मुंडे म्हणाल्या.

धनगर समाजाचं आरक्षणाचं काम होत नाही तोवर मंत्रालयाची पायरी चढणार नाही, असं वक्तव्य पंकजा मुंडे यांनी केलं. पंकजा मुंडे माळेगाव यात्रा इथे आयोजित धनगर समाज मेळाव्यात बोलत होत्या. या मेळाव्यात महादेव जानकर यांचंही भाषण झालं. जानकर यांनी आरक्षण आम्हीच देणार असल्याचं सांगितलं. या धनगर आरक्षण मेळाव्याला प्रचंड जनसमुदाय उपस्थित होता. राष्ट्रवादी काँग्रेसनेही धनगर आरक्षण मेळाव्याचं आयोजन केलं होतं, मात्र राष्ट्रवादीचा कुणीही बडा नेता माळेगावला आला नाही.