रेशनचा तब्बल 110 टन तांदूळ साठा जप्त, गोण्यांवर पंजाब-हरियाणाचा शिक्का, काळाबाजाराचा पर्दाफाश

| Updated on: Aug 01, 2020 | 8:26 PM

केंद्र सरकारकडून रेशन दुकानांमार्फत गरिब जनतेला दिल्या जाणाऱ्या तांदळाचा खुलेआम काळाबाजार होत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे (Panvel police exposed black market of rice).

रेशनचा तब्बल 110 टन तांदूळ साठा जप्त, गोण्यांवर पंजाब-हरियाणाचा शिक्का, काळाबाजाराचा पर्दाफाश
Follow us on

पनवेल : केंद्र सरकारकडून रेशन दुकानांमार्फत गरिब जनतेला दिल्या जाणाऱ्या तांदळाचा खुलेआम काळाबाजार होत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे (Panvel police exposed black market of rice). पनवेलचे पोलीस उपायुक्त अशोक दुधे यांनी हा गैरप्रकार उघडकीस आणला आहे. पनवेल शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील टेक केयर लॉजिस्टिक पळस्पे येथील रेशन दुकानात हा सर्व गैरप्रकार सुरु होता (Panvel police exposed black market of rice).

याप्रकरणी पोलिसांनी भीमाशंकर रंगनाथ खाडे, इकबाल काझी, लक्ष्मण चंद्र पटेल या आरोपींना अटक केली आहे. पोलिसांना या कारवाईत 33 लाख 8 हजार किंमतीचे तांदूळ मिळाले आहेत. पोलिसांना रेशनिंग तांदळाच्या प्रत्येकी 50 किलो वजनाच्या एकूण 2 हजार 220 गोण्या मिळाल्या आहेत. विशेष म्हणजे या गोण्यांवर पंजाब सरकार, हरियाणा सरकार, एशियन राईस, फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया असे शिक्के आहेत. दरम्यान, पोलिसांनी दोन इलेक्ट्रॉनिक वजनकाटेदेखील हस्तगत केले आहेत.

Mahafast 100 | बुलेटच्या वेगाने 100 बातम्या, ‘महाफास्ट’ रोज रात्री 7.56 वा. टीव्ही 9 मराठीवर 

पोलिसांनी कसा छडा लावला?

पनवेलमधील टेक केयर लॉजिस्टिक पळस्पे येथील रेशन दुकानात तांदळाचा काळाबाजार होत असल्याची माहिती उपायुक्त अशोक दुधे आणि पनवेल शहर पोलिसांना मिळाली. त्यानंतर वरिष्ठांच्या सूचनेनुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजयकुमार लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली पनवेल शहर पोलीस, ठाण्याचे पोलीस अधिकारी, कर्मचारी, तसेच महसूल विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी यांनी टेक केयर लॉजिस्टिक पळस्पे येथील पलक रेशन गोडाऊन येथे जाऊन दोन पंचासमक्ष छापा टाकला.

यावेळी सोलापूर जिल्ह्यातील बार्शी येथून तांदळाचे चार कंटेनर अवैध वाहतुकीद्वारे आल्याचं पोलिसांना समजले. त्याचबरोबर केंद्र सरकारकडून गोरगरिबांसाठी देण्यात आलेल्या तांदळामध्ये भेसळ करुन मालाची विक्री केलं जात असल्याचं पोलिसांच्या निदर्शनास आलं. त्यामुळे पोलिसांनी तातडीने कारवाई करत तिघांना अटक केली. या कारवाईनंतर पनवेल पोलिसांचं सर्वत्र कौतुक होत आहे.