मावळमधल्या पराभवानंतर ‘नॉट रिचेबल’ पार्थ पवार थेट इफ्तार पार्टीत दिसले!

| Updated on: Jun 04, 2019 | 8:35 AM

देहूरोड (पुणे) : लोकसभा निवडणुकीत मावळ लोकसभा मतदारसंघातून दारुण पराभव झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार पार्थ पवार ‘नॉट रिचेबल’ होते. निकालापासून त्यांनी कुठेच आपली प्रतिक्रिया व्यक्त केली नव्हती. किंवा कुठल्या जाहीर कार्यक्रमात पार्थ पवार दिसले नव्हते. अखेर देहूरोड येथे आयोजित इफ्तार पार्टीत पार्थ पवार दिसले. मावळ लोकसभा मतदारसंघामध्ये शिवसेनेचे उमेदवार श्रीरंग बारणे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार […]

मावळमधल्या पराभवानंतर नॉट रिचेबल पार्थ पवार थेट इफ्तार पार्टीत दिसले!
Follow us on

देहूरोड (पुणे) : लोकसभा निवडणुकीत मावळ लोकसभा मतदारसंघातून दारुण पराभव झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार पार्थ पवार ‘नॉट रिचेबल’ होते. निकालापासून त्यांनी कुठेच आपली प्रतिक्रिया व्यक्त केली नव्हती. किंवा कुठल्या जाहीर कार्यक्रमात पार्थ पवार दिसले नव्हते. अखेर देहूरोड येथे आयोजित इफ्तार पार्टीत पार्थ पवार दिसले.

मावळ लोकसभा मतदारसंघामध्ये शिवसेनेचे उमेदवार श्रीरंग बारणे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार पार्थ अजित पवार यांच्यावर मोठ्या फरकाने विजय मिळवला. स्वतः अजित पवार तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते  यांनी पार्थ यांच्या विजयासाठी मोठी पराकाष्ठा केली. परंतु पार्थ यांना विजयश्री खेचून आणण्यात यश आले नाही.

पार्थ यांच्या पराभवाची जवाबदारी स्वत: अजित पवारांनी स्वीकारली खरी, पंरतु लोकसभेचा निकाल लागल्यापासून पार्थ पवार मात्र नॉट रिचेबल होते.

अखेर देहूरोड येथे पवित्र रमजान महिन्याच्या निमित्ताने मुस्लिम बांधवांसाठी पार्थ पवार युवा मंचाच्या वतीने इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. या इफ्तार पार्टीत दाखल होऊन पार्थ पवार यांनी लहान मुलांना आपल्या हाताने घास भरवत रोजा सोडवला. मात्र यावेळी सुद्धा पार्थ पवारानी प्रसारमाध्यमांशी बोलणे टाळले.