भिवंडीत नागरिकांकडून स्वच्छता कर्मचाऱ्यांचे टाळ्या वाजवून स्वागत

| Updated on: Apr 10, 2020 | 12:05 AM

देशात दिवसेंदिवस कोरोना रुग्णांमध्ये वाढ होत आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य सरकारकडून अनेक प्रयत्न केले जात (People welcome cleaning staff with clap) आहे.

भिवंडीत नागरिकांकडून स्वच्छता कर्मचाऱ्यांचे टाळ्या वाजवून स्वागत
Follow us on

भिवंडी : देशात दिवसेंदिवस कोरोना रुग्णांमध्ये वाढ होत आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य सरकारकडून अनेक प्रयत्न केले जात (People welcome cleaning staff with clap) आहे. याच दरम्यान भिवंडी शहरात कोरोनाचा शिरकाव न होण्यासाठी भिवंडी महानगरपालिका प्रशासनातर्फे आज (9 एप्रिल) आदर्श पार्क, अजय नगर येथे औषध फवारणी करण्यात आली. त्यामुळे परिसरातील नगारिकांनी स्वच्छता कर्माचाऱ्यांसाठी खिडकीतून टाळ्या वाजवत कर्माचाऱ्यांना प्रोत्साहन देत त्यांचे (People welcome cleaning staff with clap) स्वागत केले.

महानगरपालिकेचे सभागृह नेते विलास पाटील हे महानगरपालिका स्वच्छता विभागाच्या अधिकारी कर्मचाऱ्यांसह या भागात औषध फवारणीसाठी आले होते. यावेळी विलास पाटील यांनी सफाई कर्मचाऱ्यांचे अभिनंदन करण्याची विनंती परिसरातील नागरिकांना केली. विलास पाटील यांच्या विनंतीनंतर सर्व इमारतींच्या खिडक्यांमधून महिला पुरुषांनी जमा होत आगळे वेगळे अभिनंदन केल्याने सफाई कर्मचाऱ्यांचा आनंद द्विगुणित झाला होता.

भिवंडी शहरात महानगरपालिका, पोलीस आणि आरोग्य प्रशासन हे कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी अनेक प्रयत्न करत आहेत. महानगरपालिकेच्या महापौर प्रतिभा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शहरात थर्मोटेस्ट तपासणी, जंतुनाशक फवारणी, नागरीकांसाठी मिस्ट स्प्रे झोन बनवले आहेत. महत्वाचे म्हणजे महानगरपालिका अधिकारी, कर्मचारी दिवस-रात्र मेहनत घेत आहेत. अशा परिस्थितीत मनपाचे सफाई कामगार हे शहर स्वच्छतेसोबतच शहरातील प्रत्येक रस्त्यावर गल्लीबोळात जंतुनाशक औषध आणि धूर फवारणीचे काम करत आहेत. त्यामुळे भिवंडीकर नागरीकांनी सर्व पालिका कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले आहे.

दरम्यान, राज्यात आतापर्यंत एक हजारपेक्षा अधिकांना कोरोनाची लागण झाली आहे. तर देशात पाच हजारांपेक्षा अधिकांना कोरोनाची लागण झाली आहे.