Mumbai | चाकरमानी कोकणात जाण्यासाठी सज्ज, एसटी बसेसच नियोजन

| Updated on: Jul 31, 2021 | 7:08 PM

प्रवासापूर्वी सर्व बसेस निर्जंतुक केल्या जाणार असून प्रवासादरम्यान सर्व प्रवाशांना मास्क घालून प्रवास करणे बंधनकारक करण्यात येणार आहे, अशी माहिती परिवहन मंत्री अनिल परब यांनी दिली.

Mumbai | चाकरमानी कोकणात जाण्यासाठी सज्ज, एसटी बसेसच नियोजन
Follow us on

मुंबई : कोकणातील चाकरमान्यांचा अत्यंत जिव्हाळ्याचा असलेल्या गणपती उत्सवासाठी एसटी महामंडळाने यंदा 2200 जादा गाड्या सोडण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबई, ठाणे, पालघर येथील प्रमुख बसस्थानकातून 4 सप्टेंबरपासून या बसेस सुटणार असून चाकरमान्यांना थेट घरापर्यंत सुखरूप सोडण्यात येणार आहे. यासाठी बसेसच बुकिंग सुरू झाला असून आता पर्यंत 1043 बसेस आरक्षित झाल्या आहेत. या बसेससाठी 16 जुलै 2021 पासून आरक्षणाला सुरुवात झाली असून चाकरमान्यांना परतीच्या प्रवासाचे देखील एकाच वेळी आरक्षण करता येणार आहे. प्रवासापूर्वी सर्व बसेस निर्जंतुक केल्या जाणार असून प्रवासादरम्यान सर्व प्रवाशांना मास्क घालून प्रवास करणे बंधनकारक करण्यात येणार आहे, अशी माहिती परिवहन मंत्री अनिल परब यांनी दिली.