‘मोदीजी माझ्या लेकीच्या लग्नाला या’, निमंत्रण देणाऱ्या रिक्षाचालकाच्या भेटीला मोदी

| Updated on: Feb 18, 2020 | 5:26 PM

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी एका रिक्षाचालकाची भेट घेतली. मोदींनी घेतलेल्या या भेटीनंतर रिक्षाचालक चर्चेत आला आहे (PM Narendra Modi meets rikshaw puller).

मोदीजी माझ्या लेकीच्या लग्नाला या, निमंत्रण देणाऱ्या रिक्षाचालकाच्या भेटीला मोदी
Follow us on

लखनऊ : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी एका रिक्षाचालकाची भेट घेतली. मोदींनी घेतलेल्या या भेटीनंतर रिक्षाचालक चर्चेत आला आहे. या रिक्षाचालकाचे नाव मंगल खेवट असं असून त्याने नरेंद्र मोदी यांना आपल्या मुलीच्या लग्नाचे निमंत्रण दिले होते (PM Narendra Modi meets rikshaw puller).

मंगल खेवट यांच्या मुलीचं लग्न 12 फेब्रुवारी रोजी पार पडलं. कामाचा व्याप आणि इतर जबाबदाऱ्यांमुळे नरेंद्र मोदी या लग्नाला उपस्थित राहू शकले नव्हते. मात्र, मोदी रविवारी वाराणसी दौऱ्यावर गेले असता त्यांनी या रिक्षाचालकाची आवर्जून भेट घेतली.

मंगल खेवट मुलीच्या लग्नाचे निमंत्रण देण्यासाठी दिल्लीच्या पंतप्रधान कार्यालयात गेले होते. त्यांनी पंतप्रधान कार्यालयातील अधिकाऱ्यांकडे निमंत्रण पत्रिका सुपूर्द केली होती (PM Narendra Modi meets rikshaw puller). त्यांच्या मुलीचं लग्न 12 फेब्रुवारीला पार पडलं. त्याअगोदर 8 फेब्रुवारीला मोदींनी मंगल खेवट यांना पत्र पाठवत मुलीला आशीर्वाद देत अभिनंदन केलं होते. ते पत्र मिळताच खेवट आणि त्यांच्या पत्नी रेणू देवी यांना प्रचंड आनंद झाला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी रविवारी वाराणसीच्या एक दिवसीय दौऱ्यावर होते. या दौऱ्यादरम्यान त्यांनी वाराणसीतल्या मंगल खेवट या रिक्षा चालकाची भेट घेतली. खेवट वाराणसीतलं आदर्श गाव म्हणून ख्याती असलेल्या डोमरी गावाचे रहिवासी आहेत.

मोदींच्या स्वच्छ भारत अभियानापासून प्रभावित होऊन खेवट यांनी गंगा नदी किनारा स्वच्छ करायची मोहिम हाती घेतली आहे. मोदींनी भेटीदरम्यान खेवट यांच्या स्वच्छतेच्या धोरणावरुन कौतुक केलं. याशिवाय कुटुंबाची विचारपूसदेखील केली. मोदींच्या या स्नेहाने मंगल खेवट भावूक झाले.