वंचित बहुजन आघाडीच्या नेत्यावर पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल

| Updated on: Jan 23, 2020 | 8:21 AM

अल्पवयीन मुलासोबत लैंगिक छळ केल्याप्रकरणी काल (22 जानेवारी) रात्री वंचित बहुजन आघाडीचे नेते डॉ. अब्दुल रहमान अंजारियांच्या विरोधात गुन्हा (Posco act on abdul anjaria) दाखल करण्यात आला आहे.

वंचित बहुजन आघाडीच्या नेत्यावर पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल
Follow us on

मुंबई : अल्पवयीन मुलासोबत लैंगिक छळ केल्याप्रकरणी काल (22 जानेवारी) रात्री वंचित बहुजन आघाडीचे नेते डॉ. अब्दुल रहमान अंजारियांच्या विरोधात गुन्हा (Posco act on abdul anjaria) दाखल करण्यात आला आहे. पॉस्को कायद्याअंतर्गत हा गुन्हा दाखल केल्यामुळे सर्वत्र या नेत्याबद्दल चर्चेचा विषय बनला आहे.

अल्पवयीन मुलासोबत लैंगिक छळ केल्याप्रकरणी पीडित मुलाच्या कुटुंबियांनी साकिनाका पोलीस स्टेशनमध्ये अंजारियांच्या (Posco act on abdul anjaria) विरोधात तक्रार दाखल केली होती. पलोसिांनी या घटनेची दखल घेत अंजारियांवर गुन्हा दाखल केला.

डॉ. अब्दुल रहमान अंजारिया यांनी 2019 मध्ये वंचित बहुजन आघाडीकडून लोकसभा निवडणूक लढवली होती. गुन्हा दाखल केला असून पोलीस या घटनेचा अधिक तपास करत आहे.