कोरेगाव भीमा येथे शौर्यदिनानिमित्त कडेकोट सुरक्षा व्यवस्था, पोलिसांकडून ‘हा’ महत्त्वाचा निर्णय

| Updated on: Dec 27, 2019 | 7:19 PM

कोरेगाव भिमा येथे 1 जानेवारीला विजयस्तंभावर शौर्यदिवस साजरा (Koregaon Bhima security arrangements) करण्यात येतो.

कोरेगाव भीमा येथे शौर्यदिनानिमित्त कडेकोट सुरक्षा व्यवस्था, पोलिसांकडून हा महत्त्वाचा निर्णय
Follow us on

पुणे : कोरेगाव भिमा येथे 1 जानेवारीला विजयस्तंभावर शौर्यदिवस साजरा (Koregaon Bhima security arrangements) करण्यात येतो. त्यासाठी देशभरातून मोठ्या संख्येने अनुयायी विजयस्तंभाला मानवंदना देण्यासाठी कोरेगाव भिमा येथे दाखल होतात. त्यामुळे येथील परिसरात शांतता आणि सुरक्षेच्या (Koregaon Bhima security arrangements) दृष्टीकोनातून 350 सीसीटीव्ही आणि 10 ड्रोन कॅमेऱ्याद्वारे नजर ठेवली जाणार असल्याचा निर्णय पोलिसांकडून घेण्यात आला आहे, अशी माहिती पोलीस अधिक्षक जयंत मिना यांनी दिली.

कोरेगाव भिमा येथे दोन वर्षापूर्वी विजयस्तंभ परिसरात दंगलीचे स्वरुप आले होते. काही समाजकंठकांनी हिंसक वळण दिले होते. त्यामुळे या परिसरात गेल्या पंधरा दिवसांपासून शासकिय पातळीवर सर्व शासकीय यंत्रणा कोरेगाव भिमा, पेरणेफाटा येथे थांग मांडून आहेत.

शासकीय यंत्रणेतून या ठिकाणी येणाऱ्या अनुयायांना कुठलाही त्रास होणार नाही याची खबरदारी घेतली जाणार आहे. सुरक्षेच्या दृष्टीकोनातून सीसीटीव्ही आणि ड्रोन कॅमेराचा आधार घेण्यात आला आहे. याच परिसरात सर्व कॅमेरांचे चित्रिकरण कंट्रोल रुमला जोडले असून त्या ठिकाणावरुन नजर ठेवली जाणार आहे.

दरम्यान, दोन वर्षापूर्वी कोरेगाव भिमा येथे दंगल झाली होती. याची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी पोलिसांसह सर्व शासकीय यंत्रणा सज्ज झाल्या आहेत. तसेच मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. यासोबतच सोशल मीडियावरही पोलिसांची नजर आहे. जर कुणी आक्षेपार्ह मेसेज किंवा पोस्ट टाकली तर त्याच्यावरही कारवाई केली जाणार आहे.