पहिली आणि दुसरीच्या विद्यार्थ्यांना आता गृहपाठ नाही!

| Updated on: Jul 05, 2019 | 4:48 PM

पुणे : शालेय मुलांवर अभ्यासक्रमाचा वाढता भडीमार थांबवण्याकरता केंद्र सरकारने पावलं उचलण्यास सुरुवात केली आहे. शालेय विद्यार्थ्यांचे 10 टक्के अभ्याक्रम कमी करण्याचे आदेश दिले असून, टप्याटप्याने येत्या काळात अजूनही अभ्यासक्रम कमी केला जाईल. तसेच पहिली आणि दुसरीचा गृहपाठही रद्द करण्याचे आदेश दिले आहेत, असं केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांनी सांगितले. शिक्षणासंदर्भात सर्व गोष्टी […]

पहिली आणि दुसरीच्या विद्यार्थ्यांना आता गृहपाठ नाही!
Follow us on

पुणे : शालेय मुलांवर अभ्यासक्रमाचा वाढता भडीमार थांबवण्याकरता केंद्र सरकारने पावलं उचलण्यास सुरुवात केली आहे. शालेय विद्यार्थ्यांचे 10 टक्के अभ्याक्रम कमी करण्याचे आदेश दिले असून, टप्याटप्याने येत्या काळात अजूनही अभ्यासक्रम कमी केला जाईल. तसेच पहिली आणि दुसरीचा गृहपाठही रद्द करण्याचे आदेश दिले आहेत, असं केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांनी सांगितले. शिक्षणासंदर्भात सर्व गोष्टी केंद्र सरकारच्या मनुष्यबळ विकास मंत्रालयाच्या अखत्यारित येतात. त्यामुळे या खात्याचे मंत्री असलेल्या प्रकाश जावडेकर यांच्या माहितीमुळे शालेय विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळला आहे.

पुण्यातील लवळे येथे मालपाणी ग्रुपच्या ध्रुव या शाळेचे उद्घाटन केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी उपस्थितांशी प्रकाश जावडेकरांनी संवाद साधला.

पालक आणि शिक्षक हल्ली मुलांवर लहानपणीच अभ्यासाचा भडीमार करतात. त्यामुळे मुलांच्या मनावर ताण येतो. यासाठी केंद्र सरकारने यावर्षी 10 टक्के अभ्यासक्रम कमी करण्याचे आदेश दिले असून पुढील वर्षी 20 टक्के करण्याचे आदेश दिलेत आहेत, अशी माहिती प्रकाश जावडेकरांनी दिली.

संबंधित बातमी : 5 वी ते 10 वी, दप्तराचं वजन किती असावं? यादी तयार

तसेच, अभ्याक्रमात मुलांनी न गुंतता त्यांनी खेळले पाहिजे, याकरता देशातील शाळांना पाच हजारापासून खेळाचे सामान खरेदी करण्याकरता आर्थिक तरतूद केली असून, ते पैसेही सर्व शाळांना दिले जात आहेत, असेही प्रकाश जावडेकर यांनी सांगितले.

पहिली आणि दुसरीमध्ये गृहपाठ कमी करण्याचे आदेश दिला. असून पुस्तकांची संख्या कमी केली जाईल असही जावडेकर यांनी यावेळी सांगितले.