सायन मृतदेह अदलाबदल प्रकरणी डॉक्टर, पोलिसांची चौकशी समिती नेमा : प्रवीण दरेकर

| Updated on: Sep 16, 2020 | 9:01 PM

मुंबई महापालिकेच्या सायन रुग्णालयातील मृतदेह अदलाबदल प्रकरणी डॉक्टर आणि पोलिसांची चौकशी समिती नेमा, अशी मागणी विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी पालिका आयुक्तांकडे केली आहे (Pravin Darekar on Sion Hospital).

सायन मृतदेह अदलाबदल प्रकरणी डॉक्टर, पोलिसांची चौकशी समिती नेमा : प्रवीण दरेकर
Follow us on

मुंबई : मुंबई महापालिकेच्या सायन रुग्णालयातील मृतदेह अदलाबदल प्रकरणी डॉक्टर आणि पोलिसांची चौकशी समिती नेमा, अशी मागणी विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी पालिका आयुक्तांकडे केली आहे (Pravin Darekar on Sion Hospital). पालिका आयुक्तांनीही समिती नेमण्याचे आश्वासन दिले आहे (Pravin Darekar on Sion Hospital).

मृत अंकुश सुरवडे याच्या कुटूंबियांना नुकसान भरपाई देण्याची मागणीही भाजपाकडून करण्यात आल्याची माहिती विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर यांनी दिली. सायन रुग्णालयातील अदलाबदल प्रकरणी विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर पालिका आयुक्त इकबाल सिंग चहल यांची आज (16 सप्टेंबर) भेट घेतली. या भेटीनंतर दरेकर यांनी ही माहिती दिली.

अंकुश सुरवडे (२६) या युवकाचा मृतदेह पालिकेच्य सायन रुग्णालयात अदलाबदली झाला होता. या प्रकरणी रुग्णालयातील कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले असून चौकशी केली जात आहे. भाजपाने विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर यांच्या उपस्थितीत या प्रकरणी रुग्णालयाबाहेर आंदोलन केले आहे. दरेकर यांनी दोषींवर कारवाईची मागणी केली आहे. त्यानंतर आज अंकुश सुरवडेच्या कुटूंबियांसोबत दरेकर यांनी पालिका आयुक्तांची भेट घेतली.

यावेळी अंकुशच्या कुटुंबियांना नुकसान भरपाई देण्याची, मृतदेह अदलाबदली प्रकरणी चौकशी समिती नेमण्याची, सायन रुग्णालयात पोस्टमार्टम विभागात एकच डॉक्टर गेले 10 वर्ष एकाच पदावर कार्यरत आहे, अंकुशच्या डोक्याला मार लागला असताना त्याच्या कमरेजवळ ऑपरेशन केल्याचे निशाण दिसत आहेत, सायन रुग्णालयाचा पुनर्विकास गेले कित्तेक वर्ष थांबला आहे यासह अनेक मुद्दे या भेटी दरम्यान पालिका आयुक्तांच्या निदर्शनास दरेकर यांनी आणून दिले. पालिका आयुक्तांनी त्यावर योग्य ती कार्यवाही करण्याचे आश्वासन आयुक्तांनी दिल्याची माहिती दरेकर यांनी दिली.

संबंधित बातम्या :

Pravin Darekar | मृतदेह आदलाबदलीप्रकरणी प्रवीण दरेकरांचं सायन हॉस्पिटलबाहेर आंदोलन

सायन रुग्णालयात दोन मृतदेहांची अदलाबदल, शवविच्छेदन विभागातील दोन कर्मचाऱ्यांचं निलंबन