Pulwama Attack : सलमानने आतिफ असलमला चित्रपटातून काढलं

| Updated on: Jul 05, 2019 | 4:25 PM

मुंबई : जम्मू-काश्मीरमधील पुलवामा हल्ल्यामध्ये सीआरपीएफच्या जवानांवर झालेल्या हल्ल्यामुळे सपूंर्ण देशात सध्या संताप व्यक्त केला जात आहे. अनेक बॉलिवूड कलाकारांनी या भ्याड हल्ल्याचा निषेध केला आहे, तर काहींनी शहिदांच्या कुटुंबीयांना मदत केली. यासोबत अनेक कलाकार या घटनेचा विरोध सोशल मीडियाच्या माध्यमातून दर्शवत आहे. याच दरम्यान पुलवामामध्ये शहीद झालेल्या कुटुंबीयांना अभिनेता सलमान खान याने मदत केली. […]

Pulwama Attack : सलमानने आतिफ असलमला चित्रपटातून काढलं
Follow us on

मुंबई : जम्मू-काश्मीरमधील पुलवामा हल्ल्यामध्ये सीआरपीएफच्या जवानांवर झालेल्या हल्ल्यामुळे सपूंर्ण देशात सध्या संताप व्यक्त केला जात आहे. अनेक बॉलिवूड कलाकारांनी या भ्याड हल्ल्याचा निषेध केला आहे, तर काहींनी शहिदांच्या कुटुंबीयांना मदत केली. यासोबत अनेक कलाकार या घटनेचा विरोध सोशल मीडियाच्या माध्यमातून दर्शवत आहे. याच दरम्यान पुलवामामध्ये शहीद झालेल्या कुटुंबीयांना अभिनेता सलमान खान याने मदत केली. विशेष म्हणजे सलमानचा नवीन चित्रपट ‘नोटबूक’ मधून त्याने पाकिस्तानी गायक आतिफ असलमला बाहेर काढले आहे. सलमान खान या चित्रपटाचा निर्माता आहे.

सलमान खानने आपल्या प्रोडक्शन हाऊसमध्ये तयार केलेल्या चित्रपटातून आतिफ असलमचे गाणं काढून टाकलं आहे. याआधी टीसीरीज या कंपनीनेही आतिफची सर्व गाणी युट्यूबवरुन अनलिस्ट केली आहेत. पुलवामा हल्ल्यानंतर पाकिस्तानी कलाकारांना बॉलिवूडमधील कलाकारांच्या रागाला सामोरे जावे लागत आहे. पाकिस्तानच्या कालाकारांना बॉलिवूडमध्ये बंदी घालण्यात आली आहे.

टोटल धमालच्या निर्मात्यांनीही पाकिस्तानमध्ये चित्रपट प्रदर्शित करणार नसल्याचा निर्णय घेतला आहे. तसेच गीतकार जावेद अख्तर आणि अभिनेत्री शबाना आझमी यांनीही कराचीमध्ये असलेला कार्यक्रम रद्द करत न जाण्याचा निर्णय घेतला.

AWCWA ची घोषणा, पाक कलाकारांसोबत काम करणार नाही

ऑल इंडिया सिने वर्कस असोसिएशन (AWCWA) या हल्ल्याचा तीव्र निषेध केला आणि आम्ही पाकिस्तानी कलाकारांना भारतीय फिल्म इंडस्ट्रीमध्ये काम करण्यासाठी बंदी घालत असल्याचे सांगितले. याशिवाय जर कोणती संस्था पाक कलाकारांसोबत काम करत असेल त्यांच्यावर AWCWA तर्फे कारवाई केली जाईल.

सलमान दोन नवीन चेहरे लाँच करणार

नुकतेच सलमानचा नवीन चित्रपट नोटबुकचा पोस्टर शेअर करण्यात आला आहे. चित्रपटाचे दिग्दर्शन नितीन कक्कड यांनी केलं आहे आणि यामध्ये जहीर इकबाल आणि प्रनुतन बहल प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत. दोन्ही कलाकार या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये एन्ट्री करत आहे.