पुण्यात अनधिकृत बांधकाम भोवलं, काँग्रेसच्या नेत्याचं नगरसेवक पद न्यायालयाकडून रद्द

| Updated on: Jul 03, 2021 | 4:35 AM

अनधिकृत बांधकाम प्रकरणी पुणे न्यायालयाने काँग्रेसचे नगरसेवक अविनाश बागवे यांचं नगरसेवक पद रद्द केलंय. या प्रकरणी मनसेचे उमेदवार भूपेंद्र शेंडगे यांनी बागवे यांच्याविरोधात दावा दाखल केला होता.

पुण्यात अनधिकृत बांधकाम भोवलं, काँग्रेसच्या नेत्याचं नगरसेवक पद न्यायालयाकडून रद्द
Follow us on

पुणे : अनधिकृत बांधकाम प्रकरणी पुणे न्यायालयाने काँग्रेसचे नगरसेवक अविनाश बागवे यांचं नगरसेवक पद रद्द केलंय. या प्रकरणी मनसेचे उमेदवार भूपेंद्र शेंडगे यांनी बागवे यांच्याविरोधात दावा दाखल केला होता. त्यावर निकाल देताना पुणे कोर्टाने बागवे यांचं नगरसेवक पद रद्द करण्याचा निर्णय दिलाय. दरम्यान, नगरसेवक अविनाश बागवे या निकालाविरोधात 17 जुलैला हायकोर्टात आव्हान देणार असल्याचं त्यांनी म्हटलंय (Pune court disqualify Avinash Bagwe as corporator).

कोण आहेत अविनाश बागवे?

अविनाश बागवे हे माजी गृहराज्यमंत्री आणि काँग्रेसचे पुणे शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष रमेश बागवे यांचे चिरंजीव आहेत. ते पुणे महानगरपालिकेच्या 2017 च्या निवडणुकीत प्रभाग क्रमांक 19 अ मधून निवडून आले होते. 4 फेब्रुवारी 2017 रोजी मनसेचे उमेदवार भूपेंद्र शेंडगे यांनी उमेदवारी अर्जाची छाननी करताना त्यात विसंगत आणि खोटी माहिती दिल्याची तक्रार केली. मात्र, यावर कोर्टाचा आदेश नसल्याचं सांगत निवडणूक अधिकाऱ्यांनी ही तक्रार फेटाळली. त्यानंतर अविनाश बागवे निवडणुकीत विजयी झाले.

अविनाश बागवे उच्च न्यायालयात दाद मागणार

दरम्यान, पुण्यातील स्थानिक न्यायालयाने दिलेल्या निकालाला अविनाश बागवे उच्च न्यायालयात आव्हान देणार आहेत. बागवे यांना उच्च न्यायालयात निकाल बदलेल असा विश्वास आहे.

हेही वाचा :

पोलिसांच्या शिष्टाईला यश, बंडातात्या कराडकर यांच्याकडून पायी वारीचा निर्णय मागे

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी आरोग्ययंत्रणा बळकट करा, अजित पवारांचे निर्देश

पोलिसांवर नागरिकांचा प्रचंड विश्वास, पण लाचखोरी, भ्रष्टाचारासारख्या अप्रवृत्तीला बळी पडू नका : अजित पवार

व्हिडीओ पाहा :

Pune court disqualify Avinash Bagwe as corporator