रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यात बसवून मनसेने अधिकाऱ्याला जाब विचारला

| Updated on: Jun 13, 2019 | 1:16 PM

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने पुण्यातील रस्त्यावर अनोखं आंदोलन केलं. रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यात थेट महापालिका अधिकाऱ्याला बसवून, मनसेने जाब विचारला.

रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यात बसवून मनसेने अधिकाऱ्याला जाब विचारला
Follow us on

पुणे : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने पुण्यातील रस्त्यावर अनोखं आंदोलन केलं. रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यात थेट महापालिका अधिकाऱ्याला बसवून, मनसेने जाब विचारला. महापालिका अधिकाऱ्याला खड्ड्यात बसवून मनसेने हे अनोखं आंदोलन केलं. बिबवेवाडी परिसरात एक दिवस आधी तयार करण्यात आलेल्या रस्त्याला तब्बल 15 फुटी खड्डा पडल्याचा दावा मनसेचा आहे. त्यामुळे मनसे कार्यकर्त्यांनी आक्रमक पवित्रा घेतला. याच खड्ड्यात पालिका अधिकाऱ्याला बसवून जाब विचारण्यात आला.

रस्त्याचं काम निकृष्ट झाल्याने अधिकाऱ्याला खड्ड्यात बसवल्याचं मनसेचं म्हणणं आहे.

इथे शाळा आहे. लहान मुलं ये –जा करतात. वाहनांची वर्दळ असते. जर रस्त्याचं काम असं होणार असेल, तर एखाद्याचा जीव गेल्यावर इकडे लक्ष देणार का असा सवाल मनसे कार्यकर्त्यांनी विचारला. तसंच कारवाई काय करणार अशीही विचारणा मनसेने केली.

यावर अधिकाऱ्यांनी सावध भूमिका घेतली. काम निकृष्ठ व्हावं अशी कुणाचीही इच्छा नसते. याबाब चौकशी करु असं या अधिकाऱ्यांनी सांगितलं.

VIDEO: