VIDEO : मी तुझ्या पोटी पुनर्जन्म घेईन, स्वप्नात येऊन सुशांतने सांगितलं : राखी सावंत

| Updated on: Jun 22, 2020 | 10:58 AM

अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येने सर्वांना धक्का बसला (Rakhi Sawant Instagram Video) आहे.

VIDEO : मी तुझ्या पोटी पुनर्जन्म घेईन, स्वप्नात येऊन सुशांतने सांगितलं : राखी सावंत
Follow us on

मुंबई : अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येने सर्वांना धक्का बसला (Rakhi Sawant Instagram Video) आहे. याच दरम्यान अभिनेत्री राखी सावंतने एक दावा करत सर्वांना आणखी एक धक्का दिला आहे. सुशांतचा पुनर्जन्म होणार आणि तो माझ्या पोटातून होणार आहे, असा दावा राखी सावंतने केला आहे. राखी सावंतच्या या दाव्यानंतर सुशांतच्या चाहत्यांकडून तिच्यावर संताप व्यक्त केला जात (Rakhi Sawant Instagram Video) आहे.

राखी सावंतने याबाबतचा एक व्हिडीओ इन्स्टाग्रामवर पोस्ट केला आहे. ज्यामध्ये राखी सावंतने सुशांतच्या पुनर्जन्मा चा दावा केला आहे.

“मी रात्री झोपली होती आणि अचानक मला धक्का बसला. माझ्या स्वप्नात सुशांत आला होता. मी विचारले की कोण आहे? मग आवाज आला मी सुशांत आहे. माझा विश्वास आहे की सुशांत माझ्या स्वप्नात आला आणि म्हणाला, मी पुन्हा जन्म घेत आहे. माझ्या चाहत्यांना सांग की मी पुन्हा जन्मलो. मी म्हणाले, कसे? त्यानंतर तो म्हणाला, मी लवकरच सांगेन. पुन्हा मी म्हणाले, मला सांग. तर सुशांत म्हणाला, राखी तू लग्न करशील आणि मी तुझ्या पोटी जन्म घेईन”, असं राखी सावंतने इन्स्टाग्रमावर पोस्ट केलेल्या व्हिडीओमध्ये सांगितले आहे.

राखी सावंतच्या या व्हिडीओनंतर सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात तिच्यावर टीका होत आहे. त्यासोबत या व्हिडीओवर लोकं वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत संताप व्यक्त करत आहेत. राखीच्या या व्हिडीओवर अनेकांनी नाराजीही दर्शवली आहे.

दरम्यान, 14 जून रोजी सुशांतने वांद्रे येथील राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. सुशांतच्या आत्महत्येने त्याच्या कुटुंबियांसोबत त्याच्या चाहत्यांनाही धक्का बसला आहे. नैराश्यातून सुशांतने आत्महत्या केली असल्याचे म्हटलं जात आहे. मात्र अद्याप खरं कारण स्पष्ट झालेलं नाही. सुशांतच्या कुटुंबियांनी या प्रकरणाची सीबीआय चौकशी व्हावी, अशी मागणी केली आहे.

संबंधित बातम्या : 

Sushant singh rajput suicide: रिया चक्रवर्तीविरोधात तक्रार दाखल

सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणी मॅनेजरला तिसऱ्यांदा बोलावलं, मुंबई पोलिसांच्या तपासाला वेग