Ration Scam : बारामतीत रेशनिंगच्या मालाची खुल्या बाजारात विक्री, छाप्यात 2 लाख 70 हजारांचा माल जप्त

| Updated on: Jun 21, 2020 | 9:34 AM

लॉकडाऊन आणि कोरोनाच्या संकट काळात गरीबांच्या तोंडचा घास हिरावण्याचे प्रकार बारामती तालुक्यात सुरुच (Ration scam in Baramati) आहेत.

Ration Scam : बारामतीत रेशनिंगच्या मालाची खुल्या बाजारात विक्री, छाप्यात 2 लाख 70 हजारांचा माल जप्त
विनामूल्य धान्य मिळवण्यासाठी रेशन कार्ड अनिवार्य
Follow us on

बारामती : लॉकडाऊन आणि कोरोनाच्या संकट काळात गरीबांच्या तोंडचा घास हिरावण्याचे प्रकार बारामती तालुक्यात सुरुच (Ration scam in Baramati) आहेत. रेशन धान्य दुकानात गरीबांसाठी आलेला माल खुल्या बाजारात विक्रीला घेवून जाणारा टेम्पो बारामती-निरा मार्गावर होळ येथे पकडण्यात आला. टेम्पोसह 2 लाख 70 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला (Ration scam in Baramati) आहे.

बारामतीच्या उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांचे पथक, वडगाव निंबाळकर पोलीस ठाणे यांनी संयुक्तपणे ही कारवाई केली. याप्रकरणी वडगाव निंबाळकर येथील दुकानदार शशिकांत शहा आणि टेम्पोचालक शशिकांत कदम यांच्यावर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बारामती-निरा रस्त्यावर होळ गावच्या हद्दीत आठ फाटा येथे ही कारवाई करण्यात आली.

कारवाई दरम्यान या टेम्पोमधून (एमएच-42, एम-6308) 18 हजार 700 रुपयांच्या 17 पिशव्या गहू, 52 हजार 500 रुपये किमतीच्या 35 पिशव्या तांदूळ जप्त करण्यात आला आहे. उपविभागीय पोलीस अधिकारी नारायण शिरगावकर यांच्याकडे यासंबंधीच्या तक्रारी गेल्या होत्या. त्यानुसार सापळा लावत टेम्पो पकडण्यात आला. नायब तहसीलदार महादेव भोसले यांच्या उपस्थितीत हा माल रेशनिंगचा असल्याची खात्री करण्यात आली. पंचनामा करून हा माल जप्त करण्यात आला आहे.

संबंधित बातम्या : 

Ration card | 1 जूनपासून रेशन कार्डबाबत नवे नियम, नेमके बदल काय?

रेशनकार्डचा रंग बघून उपचार देणार का? मनसे आमदार राजू पाटील यांचा सरकारला सवाल