कोरोना योद्ध्यांसाठी रोबोकार्टची निर्मिती, मोबाईलने नियंत्रण, रत्नागिरीच्या विद्यार्थ्यांचा प्रयोग

| Updated on: Jul 07, 2020 | 8:58 PM

रुग्णसेवा करताना कोरोना योद्ध्यांना कोरोनाची लागण होऊ नये, यासाठी देवरुख येथील राजेंद्र माने अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी अनोखा प्रयोग केला आहे (Ratnagiri students make Robot cart).

कोरोना योद्ध्यांसाठी रोबोकार्टची निर्मिती, मोबाईलने नियंत्रण, रत्नागिरीच्या विद्यार्थ्यांचा प्रयोग
Follow us on

रत्नागिरी : कोरोनाविरोधाच्या लढाईत डॉक्टर, नर्सेस आणि आरोग्य कर्मचारी महत्त्वाची भूमिका बजावत आहेत (Ratnagiri students make Robot cart). रुग्णसेवा करताना त्यांना कोरोनाची लागण होऊ नये, यासाठी देवरुख येथील राजेंद्र माने अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी अनोखा प्रयोग केला आहे. या विद्यार्थ्यांनी कोरोना योद्ध्यांसाठी रोबोकार्टची निर्मिती केली आहे. विशेष म्हणजे या रोबोकार्टला मोबोईलने नियंत्रित केलं जाऊ शकतं (Ratnagiri students make Robot cart).

कोरोना रुग्णांच्या संपर्कात कमीत कमी आरोग्य विभागातील कर्मचारी कसे येतील, हा मुद्दा राजेंद्र माने अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांच्या डोक्यात घोळत होता. त्यातूनच त्यांनी सोशल डिस्टन्सिंग ठेवून कोरोना रुग्णांवर उपचार कसे करता येतील यासाठी उपकरण बनवण्याचे ठरवले.

अभियांत्रिकी विद्यार्थ्यांना दीड महिन्यात प्राध्यापकांच्या मार्गदर्शनाखाली एक उपकरण तयार केले. त्यांनी मोबाईल अ‍ॅपच्या माध्यमातून त्यांनी रोबो कार्टची निर्मिती केली. विशेष म्हणजे या कार्टच्या माध्यमातून कोरोना रुग्ण कसा आहे, हे दिसण्यापासून ते रुग्णांशी संवाद साधण्यापर्यत, सर्व गोष्टी आरोग्य विभागाचे कर्मचारी सोशल डिस्टसिंग ठेवून करु शकणार आहेत.

अ‍ॅल्युमिनियमचा वापर या कार्टमध्ये करण्यात आला आहे. मोबाईलमधील एका अ‍ॅपद्वारे हे कार्ट नियंत्रित केले जाते. या कार्टला मोबाईल जोडून थेट कोरोना वॉर्डमधील रुग्णांशी डॉक्टर संपर्क साधू शकणार आहेत. इंटरनेटच्या वापराशिवाय डॉक्टर किंवा नर्सेस मोबाईल अ‍ॅपद्वारे रुग्णांशी संवाद शाधू शकतील.

TOP 9 | लोकल ते ग्लोबल, सर्व बातम्या एकत्र, पाहा टॉप 9 न्यूज! 

विशेष म्हणजे हे रोबोकार्ट पूर्णत: बॅटरीवर अवलंबून आहे. या रोबोकार्टच्या निर्मितीसाठी जवळपास 25 हजारांचा खर्च आला. या कार्टची वजन वाहन क्षमता 50 किलोची आहे. या कार्टला ब्लूटूथ टेक्नोलॉजीद्वारे 30 मीटरपर्यंत नियंत्रण करता येऊ शकतं. डॉक्टर सुरक्षितपणे रुग्णाला पाहून त्याच्याशी संवाद साधू शकतात. वापरानंतर कार्टचे सहजपणे निर्जंतुकीकरण करता येऊ शकतं.

या कार्टची उपयुक्तता पाहून माने अभियंत्रिकी महाविद्यालयाला रत्नागिरीच्या जिल्हा प्रशासनानं अशा 10 रोबोकार्ट बनवण्याची आर्डर दिली आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील प्रत्येक कोविड सेंटरला हे रोबोकार्ट वापरण्यात येणार आहे.

दरम्यान, मुंबईतही पोद्दार रुग्णालयात ‘गोलर’ रोबोट रुग्णसेवेसाठी दाखल झाला आहे. अन्न, पाणी आणि औषधे रुग्णांपर्यंत पोहोचवण्याचे काम ‘गोलर’ करत आहे.

हेही वाचा : EXCLUSIVE | ….म्हणून आम्ही राष्ट्रवादीत गेलो, शिवसेना सोडणाऱ्या पारनेरच्या नगरसेवकांची खदखद