बिबट्याच्या संरक्षणसाठी अनोखे यंत्र, पुण्याच्या शाळकरी विद्यार्थ्याची भन्नाट कल्पना

| Updated on: Dec 22, 2019 | 8:26 PM

जुन्नर, आंबेगाव, शिरुर, खेड या भागात बिबट्याचा वावर वाढला आहे. या तालुक्यात ऊस शेती मोठ्या प्रमाणात असल्याने बिबट्यांना सुरक्षीत अशी जागा मिळत आहे.

बिबट्याच्या संरक्षणसाठी अनोखे यंत्र, पुण्याच्या शाळकरी विद्यार्थ्याची भन्नाट कल्पना
Follow us on

पुणे : जुन्नर, आंबेगाव, शिरुर, खेड या भागात बिबट्याचा वावर वाढला आहे. या तालुक्यात ऊस शेती मोठ्या प्रमाणात असल्याने बिबट्यांना सुरक्षीत अशी जागा मिळत आहे. त्यामुळे बिबटे शेताजवळील गावाकडे आपला मोर्चा वळवत आहेत. त्यामुळे बिबटे आणि गावातील नागरिकांमध्ये संघर्ष वाढलेला आहे. बिबटे पाळीव प्राण्यांवर हल्ले करत आहेत. यावर आळा घालण्यासाठी आंबेगावातील एका शाळकरी मुलाने बिबट्यापासून संरक्षण मिळावे यासाठी एक अनोखे यंत्र (School student make machine for leopard in pune) तयार केले आहे.

उत्तर पुणे जिल्ह्याच्या शिरूर, आंबेगाव, खेड, जुन्नर या तालुक्यात बिबट्या दररोज पाळीव प्राणी आणि मनुष्य यांच्या वरती हल्ले करत आहे. यावर आळा घालण्यासाठी नरसिंह विद्यालयात शिक्षण घेणाऱ्या अमन भंडारी या तरूणाने शाळेच्या विज्ञान प्रदर्शनात बिबट्यापासून संरक्षण मिळवण्यापासून तोफ (यंत्र) तयार (School student make machine for leopard in pune) केली आहे. ही तोफ त्याने घरगुती टाकावू वस्तूपासून तयार केली आहे. बिबट्या मोठ्या आवाजांना घाबरतो त्यामुळे विद्यार्थ्याने मोठा आवाज करणारी तोफ तयार केली आहे.

अमनच्या मनात नेहमी काहीतरी वेगळं करून दाखवण्याची जिद्द होती. याच जिद्दीतून त्याने आपल्या ज्ञानाचा वापर करत घरातील खराब झालेल्या पीवीसी पाईपचे तुकडे घेतले. त्यानंतर या पाईपांसोबत लाईटर कॅल्शियम कार्बाइड, पाणी यांच्या माध्यमातून फटाक्यापेक्षाही मोठा आवाज करणारी तोफ बनवली आहे.

बिबट्या हा अतिषय चपळ भक्ष्यक प्राणी असून बिबट्याचे वास्तव हे जंगलात असते. परंतु सध्या मनुष्याकडून जंगलाचे आपले जिरायत क्षेत्र बागायती करुन ऊसाची शेती फुलवण्यात आली आहे. मग बिबट्यानेही आपले वास्तव याच ऊसाच्या शेतीत केले आहे. रात्रीच्या वेळी भक्ष्य म्हणून पाळीव प्राणी आणि मनुष्य यांच्यावर बिबटे हल्ले करत आहेत.

“बिबट्या हा मोठ्या आवाजाला घाबरणारा प्राणी आहे. बिबट्या हा मोठा आवाज ऐकल्यास त्या ठिकाणावरुन पळून जातो. त्यामुळे आपणही बिबट्यापासून या तोफेचा वापर करुन आपले सहज संरक्षण करु शकतो”, असं वनधिकारी यांनी सांगितले.