नालासोपाऱ्यात व्हॉट्सअॅपच्या माध्यामातून सेक्स रॅकेट

| Updated on: Jul 12, 2021 | 10:53 AM

नालासोपारा : ऑनलाईन सेक्स रॅकेटचा नालासोपाऱ्यात भांडाफोड करण्यात आला आहे. पालघरचे पोलीस अधीक्षक गौरव सिंह यांच्या पथकाने बोगस गिऱ्हाईक पाठवून याचा भांडाफोड केला. यात पैशाच्या अमिषापोटी वेश्याव्यासाय करणाऱ्या चार विवाहित महिला आणि एक दलाल महिलेला रंगेहाथ ताब्यात घेतले असून त्यांच्यावर तुलींज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. पोलिसांच्या ताब्यात असणाऱ्या या सर्व […]

नालासोपाऱ्यात व्हॉट्सअॅपच्या माध्यामातून सेक्स रॅकेट
Follow us on

नालासोपारा : ऑनलाईन सेक्स रॅकेटचा नालासोपाऱ्यात भांडाफोड करण्यात आला आहे. पालघरचे पोलीस अधीक्षक गौरव सिंह यांच्या पथकाने बोगस गिऱ्हाईक पाठवून याचा भांडाफोड केला. यात पैशाच्या अमिषापोटी वेश्याव्यासाय करणाऱ्या चार विवाहित महिला आणि एक दलाल महिलेला रंगेहाथ ताब्यात घेतले असून त्यांच्यावर तुलींज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.

पोलिसांच्या ताब्यात असणाऱ्या या सर्व महिलांवर पैशासाठी देहव्यापर करत असल्याचा आरोप आहे. यांच्यात एक दलाल महिला आहे, जिने या सर्व महिलांचा एक व्हॉट्सअॅप ग्रुप बनवला होता. यामध्ये पर्सनल आणि व्हॉट्सअॅप ग्रुपवर महिलांचे विविध प्रकारचे फोटो गिऱ्हाईकांना पाठवून त्यांना आकर्षित केले जात असे. एकमेकांची पसंती आणि आर्थिक व्यवहार ठरताच नालासोपारा परिसरातील वेगवेगळ्या भागात बोलावून देहव्यापर करण्यात येत होता. पर्सनल आणि व्हॉट्सअॅप ग्रुपवर विवाहित आणि अविवाहित महिलांचे ऑनलाइन सेक्स रॅकेट चालत असल्याची माहिती पालघरचे पोलीस अधीक्षक गौरव सिंह यांना मिळाली. त्यांच्या पथकाने बोगस गिऱ्हाईक पाठवून सापळ रचला होता आणि या सेक्स रॅकेटचा भांडाफोड केला.

नालासोपाऱ्यात पोलिसांनी सापळा रचला होता. मात्र दलाल महिला सतत स्पॉट बदलत असल्याने पोलिसांना धाड टाकणे कठीण जात होते. दलाल महिलेने बोगस गिऱ्हाईकाला व्हॉट्सअॅपवर महिलांचे फोटो पाठवले आणि एका तासाचे 1500 रुपये आणि दलाला महिलेचे 1000 रुपये असे एकूण 2500 रुपये ठगवले. मात्र कुठे भेटायचे हे निश्चित सांगितले जात नव्हते. शेवटी नालासोपारा प्रल्हार फाटा मुख्य रस्त्यावरील गावराईपाडा पाडा परिसरातील रॉयल हॉटेलच्या बाजूच्या मोकळ्या मैदानात भेटण्याचे ठरले आणि याच मैदानात पोलिसांच्या बोगस गिऱ्हाईकसोबत मुली दाखवून डील करतांना रंगेहाथ महिला आणि दलाल महिला यांना पकडले आहे.

सेक्स रॅकेटमध्ये पकडण्यात आलेल्या सर्व महिला ह्या सर्वसामान्य कुटुंबातील आहेत. कुटुंबात आर्थिक चणचण भासत होती. महागाईत पतीचे उत्पन्न कमी पडत होते. आर्थिक गरज भागवण्यासाठी कामाच्या शोधात निघालेल्या महिलांना हेरून, कमी वेळात जास्त पैसे कामवण्याचे आश्वासन दिले जात होते. याच मजबुरीचा फायदा घेऊन त्यांना वेश्याव्यवसायात ढकलले जात असल्याचेही समोर आलं आहे. या सर्व प्रकरणात पालघरचे पोलीस अधीक्षक गौरव सिंह यांच्या पथकाने छापा मारून या महिलांना अटक केली आहे. त्यांना तुलींज पोलिसांच्या ताब्यात देऊन त्यांच्यावर गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. आता या सेक्स रॅकेटमध्ये कुणाकुणाचा सहभाग आहे, हे मात्र पोलीस तपासानंतर समोर येईल.

मागच्या आठवड्यात मुंबई अहमादाबाद महामार्गावरील सेल्फी ढाब्यावर छापा टाकून हायप्रोफाईल सेक्स रॅकेटचा पर्दाफाश याच पथकाने केला होता. आता पुन्हा एकदा online सेक्स रॅकेटचा भांडाफोड झाल्याने वसई, विरार, नालासोपारा परिसरात कशा पद्धतीने सेक्स रॅकेट चालवले जात आहेत आणि त्यात मजबूर महिलांना कशी शिकार बनवले जात आहे, हे समोर आले आहे.