कोणत्या टेक्निकने शाहरुख हिरोचा ‘झिरो’ बनला?

| Updated on: Jul 05, 2019 | 4:48 PM

मुंबई : किंग खान शाहरुखचा मच अवेटेड सिनेमा झिरो रिलीज झालाय. या सिनेमाने पहिल्याच दिवशी 29 कोटींची कमाई करत ग्रँड ओपनिंग मिळवली आहे. पण या सिनेमापेक्षा सर्वात जास्त चर्चा आहे ती म्हणजे शाहरुखच्या उंचीची. पाच फूट आठ इंच आकाराच्या शाहरुखला यात चार फूट सहा इंच दाखवण्यात आलंय. एका खास टेक्निकचा यासाठी वापर करण्यात आलाय. झिरो […]

कोणत्या टेक्निकने शाहरुख हिरोचा झिरो बनला?
Follow us on

मुंबई : किंग खान शाहरुखचा मच अवेटेड सिनेमा झिरो रिलीज झालाय. या सिनेमाने पहिल्याच दिवशी 29 कोटींची कमाई करत ग्रँड ओपनिंग मिळवली आहे. पण या सिनेमापेक्षा सर्वात जास्त चर्चा आहे ती म्हणजे शाहरुखच्या उंचीची. पाच फूट आठ इंच आकाराच्या शाहरुखला यात चार फूट सहा इंच दाखवण्यात आलंय. एका खास टेक्निकचा यासाठी वापर करण्यात आलाय.

झिरो सिनेमात फोर्स्ड परस्पेक्टिव्ह (Forced Perspective) या तंत्राचा वापर करण्यात आलाय. या टेक्निकमुळे ऑप्टिकल इल्युजन तयार होतं, ज्यामुळे कोणतीही वस्तू वास्तविक आकारापेक्षा छोटी दिसते. या दृश्यांची शुटिंग दोन वेळा करावी लागते. जी वस्तू छोटी दाखवायची आहे, त्या अँगलने एकदा आणि सामान्य प्रेक्षकांसाठी एकदा अशी दोन वेळा शुटिंग होते.

शाहरुख खानची कंपनी रेड चिलीज एंटरटेनमेंटच्या जवळपास साडे चारशे लोकांनी हे काम पार पाडलंय. झिरो सिनेमात वापरण्यात आलेली व्हिज्युअल इफेक्ट टेक्नीक फक्त भारतच नव्हे, तर जगभरातील सिनेमांमध्ये सर्वोत्कृष्ट असल्याचं शाहरुखने सांगितलं होतं. असे सिनेमे कायम बनवता येत नाहीत. याला खुप वेळ लागतो आणि पैसाही तेवढाच लागतो, असंही शाहरुख म्हणाला होता.

शाहरुखला बुटका दाखवण्यासाठी सीबी ट्रॅकर्सचाही वापर करण्यात आलाय. शुटिंग करताना हे ट्रॅकर्स शरीरात लावले जातात. शुट झालेल्या सीनला थ्री डी इमेजमध्ये तयार केलं जातं.

झिरो सिनेमात वापरण्यात आलेल्या टेक्निकचा वापर हॉलिवूड सिनेमात अनेकदा करण्यात आलाय. द लॉर्ड ऑफ द रिंग्स आणि हॅरी पॉटर हे सिनेमे याची उदाहरणं आहेत. पण बॉलिवूडमध्ये ही टेक्निक पहिल्यांदाच वापरण्यात आली आहे.

सिनेमाचा ट्रेलर :