आणखी दहा जणांना कोर्टात जायचं तर जाऊ द्या, पार्थबाबतच्या प्रश्नावर शरद पवारांचं उत्तर

| Updated on: Oct 02, 2020 | 6:20 PM

मराठा आरक्षणासाठी दहा जण न्यायालयात जाणार असतील तर जाऊ द्या, असे उत्तर शरद पवारांनी पार्थ पवारांच्या बद्दल विचारलेल्या प्रश्नावर दिले. (Sharad Pawar comment on Parth Pawar)

आणखी दहा जणांना कोर्टात जायचं तर जाऊ द्या, पार्थबाबतच्या प्रश्नावर शरद पवारांचं उत्तर
Follow us on

पुणे: पार्थ पवारांनी विवेक रहाडेच्या आत्महत्येनंतर मराठा आरक्षणासाठी सर्वोच्च न्यायालयात हस्तक्षेप याचिका दाखल करणार असल्याचे ट्विट केले होते. राज्य सरकार स्थगिती उठवण्यासाठी प्रयत्न करत आहे, मराठा आरक्षणासाठी आणखी दहा जणांना कोर्टात जायचे तर जाऊ द्या, त्यांना आमची भूमिका पोषक राहील, असे उत्तर शरद पवार यांनी पार्थ पवारांबाबत विचारलेल्या प्रश्नावर दिले. (Sharad Pawar comment about Partha Pawar stand on Maratha reservation)

मराठा आरक्षणावरिल स्थगिती उठवण्यासाठी राज्य सरकार सर्वोच्च न्यायालयात गेले आहे. पार्थ पवारांनी मांडलेल्या भूमिकेवर बोलताना शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसने विधीमंडळात मराठा आरक्षणाला पाठिंबा दिला आहे. पार्थच काय आणखी 10 जण न्यायालयात गेले तरी त्यांना पाठिंबा देण्याची आमची भूमिका राहणार आहे, असे शरद पवारांनी स्पष्ट केले. मराठा आरक्षणासाठी कपिल सिब्बल यांच्या सारख्या निष्णात वकिलांशी चर्चा करत आहे. आत्महत्या करणे हा मार्ग नाही, असे आवाहन पवारांनी मराठा तरुणांना केले आहे.

अजित पवारांची भूमिका

राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी मुलगा पार्थ पवार यांच्या मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर केलेल्या ट्विटवर प्रतिक्रिया दिली आहे (Ajit Pawar on controversial tweet of Parth Pawar on Maratha Reservation). यावेळी त्यांनी तुम्ही तुमची मुलं काय ट्विट करतात हे पाहता किंवा विचारतात का? असा प्रश्न विचारला. पार्थ पवार यांच्या ट्विटवर माझी बहिण सुप्रिया सुळे यांनी भूमिका स्पष्ट केल्याचंही म्हटलं. पुणे स्टेशन येथे महात्मा गांधी यांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यासाठी आले असता अजित पवार बोलत होते.

सर्वोच्च न्यायालयात हस्तक्षेप याचिका करण्याची पार्थ पवारांची भूमिका

बीड  जिल्ह्यातील विवेक रहाडे या विद्यार्थ्यांने शिक्षणाच्या चिंतेतून आत्महत्या केली होती.  यानंतर  “विवेकनं आमच्या मनात पेटवलेली संघर्षाची ज्योत संपूर्ण व्यवस्थेला भस्मसात करू शकते. संपूर्ण मराठा तरुणांचं भवितव्य अंधकारमय झालं आहे. त्यामुळे मी सर्वोच्च न्यायालयात हस्तक्षेप याचिका दाखल करणार आहे. त्याशिवाय माझ्याकडे पर्याय उरला नाही,’ असं पार्थ पवार ट्विटमध्ये म्हणाले होते.

दरम्यान,  सरकार पडेल या अपेक्षेने चंद्रकांत पाटील तयार असतात. मात्र, त्यांना साडेचार वर्षा वाट पाहावी लागेल, असा टोला शरद पवारांनी लगावला.

संबंधित बातम्या :

तुमची मुलं काय ट्विट करतात हे तुम्ही पाहता का? पार्थ पवारांवरुन अजित पवारांचा प्रश्न

मराठा आरक्षणप्रश्नी पार्थ पवार मैदानात; सर्वोच्च न्यायालयात हस्तक्षेप याचिका दाखल करणार!

(Sharad Pawar comment about Partha Pawar stand on Maratha reservation)