शिर्डीतून आणखी चार शहरं हवाईमार्गाने जोडणार

| Updated on: Jul 05, 2019 | 4:55 PM

मनोज गाडेकर, टीव्ही 9 मराठी, शिर्डी : साई भक्तांसाठी एक खुशखबर आहे. येत्या नवीन वर्षात शिर्डीमध्ये इतर शहरांमधील विमानांचे उड्डाण होणार आहे. सध्या शिर्डीहून मुंबई, हैद्राबाद आणि दिल्लीकडे जाणाऱ्या फ्लाईट्सची संख्या दहा इतकी आहे. ही विमान सेवा गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात सुरु करण्यात आली होती. 6 जानेवारी 2019 पासून बंगळुरु-शिर्डी-मुंबई, अहमदाबाद-शिर्डी, जयपूर-शिर्डी, भोपाळ-शिर्डी या नवीन शहरांच्या विमानांची उड्डाण […]

शिर्डीतून आणखी चार शहरं हवाईमार्गाने जोडणार
Follow us on

मनोज गाडेकर, टीव्ही 9 मराठी, शिर्डी साई भक्तांसाठी एक खुशखबर आहे. येत्या नवीन वर्षात शिर्डीमध्ये इतर शहरांमधील विमानांचे उड्डाण होणार आहे. सध्या शिर्डीहून मुंबई, हैद्राबाद आणि दिल्लीकडे जाणाऱ्या फ्लाईट्सची संख्या दहा इतकी आहे. ही विमान सेवा गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात सुरु करण्यात आली होती. 6 जानेवारी 2019 पासून बंगळुरु-शिर्डी-मुंबई, अहमदाबाद-शिर्डी, जयपूर-शिर्डी, भोपाळ-शिर्डी या नवीन शहरांच्या विमानांची उड्डाण होणार आहे. तसेच शिर्डीमध्ये स्पाईस जेटल परवानगी दिली आहे. एका वर्षात शिर्डीच्या विमानसेवेला साईभक्तांनी भरभरुन प्रतिसाद दिल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे.

6 जानेवारी 2019 पासून कोणत्या नवीन सेवा?

  • बंगळुरु-शिर्डी-मुंबई

  • अहमदाबाद-शिर्डी

  • जयपूर-शिर्डी

  • भोपाळ-शिर्डी

साईबाबांच्या दर्शनासाठी दर दिवशी सुमारे 1 लाख भक्त शिर्डीमध्ये येतात. तर गुरुवार, शनिवारी आणि रविवारी ही संख्या दुप्पट होते. विमानसेवा सुरु होण्याआधी शिर्डीला जाण्यासाठी रस्ते वाहतूक आणि रेल्वे वाहतूक हेच दोन पर्याय होते. मात्र, शिर्डीची विमानसेवा सुरु केल्यानंतर साईभक्तांनी याला चांगला प्रतिसाद दिला.  तर गेल्या वर्षभरात 1 लाख 25 हजार भक्तांनी विमानसेवेचा लाभ घेतला आहे.

संबंधित बातम्या : शिर्डी विमानतळ बॉम्बने उडवण्याची धमकी