केडीएमसीच्या माजी महापौर कल्याणी पाटील यांचं स्वाईन फ्लू आजाराने निधन

| Updated on: Sep 10, 2019 | 7:05 PM

कल्याण-डोबिंवली महानगर पालिकेच्या (KDMC) माजी महापौर कल्याणी पाटील (Mayor Kalyani Patil) यांचं स्वाईन फ्लू आजारामुळे निधन (Death) झालं आहे.

केडीएमसीच्या माजी महापौर कल्याणी पाटील यांचं स्वाईन फ्लू आजाराने निधन
Follow us on

ठाणे : कल्याण-डोबिंवली महानगर पालिकेच्या (KDMC) माजी महापौर कल्याणी पाटील (Mayor Kalyani Patil) यांचं स्वाईन फ्लू (Swaine flu)  आजारामुळे निधन झालं आहे. ठाण्याच्या खासगी रुग्णालयात आज (10 सप्टेंबर) दुपारी त्यांची प्राणज्योत मालवली.

कल्याण पाटील (Mayor Kalyani Patil) यांना गेल्या महिन्यात 14 ऑगस्ट रोजी स्वाईन फ्लूची लागण झाली होती. त्यानंतर त्यांना तातडीने ठाण्यातील खासगी रुग्णालयात दाखल केले होते. त्यांच्यावर डॉक्टरांकडून उपचारही सुरु होते. या दरम्यान त्यांच्या प्रकृतीत सुधारणाही होत होती. पण गेल्या तीन-चार दिवसांपासून त्यांची प्रकृती खलावली, अशी माहिती वैद्यकीय सूत्रांनी दिली आहे.

कल्याणी पाटील 2013 ते 2015 कालावधीत कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या महापौर होत्या. शिवसेनेकडून त्यांनी 2014 रोजी विधानसभा निवडणूकही लढवली होती. पण त्यामध्ये त्यांना भाजपच्या उमेदवारांकडून पराभव पत्कारावा लागला होता.

दरम्यान, 1 जून ते 18 ऑगस्ट या कालावधीत गेस्ट्रोचे 141, काविळ 137, टायफॉईड 350, लेप्टोस्पायरोसीसी 3, मलेरिया 108, संशयित डेंग्यू 154 रुग्ण आढळून आले आहेत. तर स्वाईन फ्लूचे 37 रुग्ण आढळून आले असून त्यातील तीन रुग्णांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती एका वृत्तसंस्थेने दिली आहे.