Shraddha Kapoor | बॉलिवूडची नवी इच्छाधारी नागिण, श्रद्धा कपूरकडून आगामी चित्रपटाचा उलगडा!

| Updated on: Oct 28, 2020 | 4:59 PM

श्रद्धा कपूरने नुकतीच इंस्टाग्रामवर एक स्टोरी पोस्ट केली आहे. या स्टोरीत तिने तिच्या या आगामी चित्रपटाची माहिती दिली आहे.

Shraddha Kapoor | बॉलिवूडची नवी इच्छाधारी नागिण, श्रद्धा कपूरकडून आगामी चित्रपटाचा उलगडा!
Follow us on

मुंबई : ‘स्त्री’ आणि ‘छिचोरे’ यासारख्या चित्रपटांनी सर्वांना प्रभावित करणारी बॉलिवूड अभिनेत्री श्रद्धा कपूर (Shraddha Kapoor) लवकरच इच्छाधारी नागिणीच्या (Ichhadhari Nagin) भूमिकेत दिसणार आहे. या आधी बॉलिवूडमध्ये रेखा आणि श्रीदेवी या इच्छाधारी नागिणीच्या भूमिकेसाठी प्रसिद्ध होत्या. चित्रपट सृष्टीत सध्या पुन्हा जुने ट्रेंड सुरू झाले आहेत. ‘नागिन’ आणि ‘नगीना’सारख्या चित्रपटात इच्छाधारी नागिणीची भूमिका साकारणे श्रीदेवीच्या चित्रपट कारकीर्दीसाठी महत्त्वपूर्ण ठरले होते. श्रद्धा कपूरसाठी देखील ही भूमिका तिच्या कारकिर्दीत बरेच बदल घडवून आणू शकणारी ठरू शकते. (Shraddha Kapoor to play ichhadhaari Nagin in her upcoming Movie)

श्रद्धा कपूरने नुकतीच इंस्टाग्रामवर एक स्टोरी पोस्ट केली आहे. या स्टोरीत तिने तिच्या या आगामी चित्रपटाची माहिती दिली आहे. या चित्रपटात ती नागिणीच्या भूमिकेत दिसणार आहे. या बद्दल सांगताना श्रद्धाने लिहिले की, ‘पडद्यावर नागिणीची भूमिका साकारणे माझ्यासाठी खरंच खूप मोठी गोष्ट आहे. मी ‘नागिन’ आणि ‘नगीना’मध्ये श्रीदेवी मॅमना बघत मोठी झाली आहे. त्यांना बघून, मला नेहमीच ही भूमिका करायला मिळावी अशी माझी इच्छा होती.’

या चित्रपटाचे नाव अद्याप गुलदस्त्यात ठेवण्यात आले आहे. या चित्रपटाची निर्मिती विशाल फुरिया डायरेक्ट आणि निखिल द्विवेदी यांनी केली आहे. या चित्रपटातून एक प्रेमकथा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ज्यामध्ये बरेच व्हिज्युअल इफेक्ट्स वापरले जाणार आहेत. तसेच, श्रद्धाचा हा चित्रपट तीन भागात प्रदर्शित होणार आहे. (Shraddha Kapoor to play ichhadhaari Nagin in her upcoming Movie)

ड्रग्ज प्रकरणामुळे श्रद्धा कपूर चर्चेत

बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणात बॉलिवूडचे ड्रग्ज कनेक्शन समोर आल्यानंतर एनसीबीने धडक कारवाई सुरू केली होती. या प्रकरणात बॉलिवूडच्या बऱ्याच अभिनेत्रींची नावे समोर आली होती. यात श्रद्धा कपूरच्या नावाचाही समवेश होता.(Shraddha Kapoor to play ichhadhaari Nagin in her upcoming Movie)

क्वान कंपनीच्या कर्मचारी जया साहाने आपण सुशांत आणि श्रद्धासाठी ड्रग्ज मागवायचो अशी कबुली दिल्यांनतर श्रद्धा कपूरची देखील चौकशी करण्यात आली होती. मात्र, चौकशीनंतर श्रद्धा कपूरला सोडून देण्यात आले होते.

वर्कफ्रंटबद्दल बोलायचे तर, श्रद्धा कपूर शेवट ‘बाघी 3’मध्ये टायगर श्रॉफसोबत झळकली होती. श्रद्धा आणि टायगरसमवेत रितेश देशमुखसुद्धा या चित्रपटात महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसला होता. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कामगिरी केली होती.

श्रद्धा कपूरकडून ड्रग्ज सेवनाचा इन्कार; ‘छिछोरे’च्या पार्टीला गेले, मात्र ड्रग्ज घेतलं नाही!

(Shraddha Kapoor to play ichhadhaari Nagin in her upcoming Movie)